शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

निविदा कोटीची अन् उड्डाणे लाखोंची

By admin | Published: July 24, 2016 11:46 PM

श्रीगोंदा : श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षपदासाठी ३० जुलैला निवडणूक होत आहे. पालिकेतील ३३ कोटींच्या रस्त्याच्या टेंडरवर डोळा ठेवून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी फिल्डींग लावली आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षपदासाठी ३० जुलैला निवडणूक होत आहे. पालिकेतील ३३ कोटींच्या रस्त्याच्या टेंडरवर डोळा ठेवून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी फिल्डींग लावली आहे. या निवडीत लाखोंची उड्डाणे सुरू झाली आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक अटीतटीची होण्याचे संकेत आहेत. पालिकेत सत्ताधारी गटाचे आठ तर विरोधी गटाचे दहा नगरसेवक आहेत. दीड महिन्यापूर्वी झालेल्या नगराध्यक्ष निवडीत विरोधकांचे प्रयत्न निष्फळ ठरले. परिणामी नगराध्यक्षपदाची माळ भाजपाच्या सुनीता शिंदे यांच्या गळ्यात पडली. मात्र या निवडणुकीत राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे व कुकडी साखर कारखान्याचे संस्थापक कुंडलिक जगताप यांनी एकत्र मूठ बांधण्यासाठी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यामुळे विरोधी गटाच्या आशा वाढल्या आहेत. माजी मंत्री बबनराव पाचपुते व बाबासाहेब भोस यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर पोटे यांनी सुरुवातीपासून बेरजेच्या राजकारणासाठी डावपेच टाकले आहेत. बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून शहरातील १७ रस्त्यांच्या कामासाठी ३३ कोटी मंजूर झाले आहेत. या कामाच्या फेरनिविदा निघणार आहेत. या निविदेमधील अर्थकारणाचा हिशोब करून नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनोहर पोटे व फक्कड मोटे यांनी शेवटच्या टप्प्यात निराळ्या पध्दतीने व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे या निवडीत लाखोंची उड्डाणे सुरू झाली आहेत. त्यामुळे दिवसाला शेअर बाजाराप्रमाणे मतांचा निर्देशांक बदलत आहे. अर्थकारणाभोवती फिरणाऱ्या या निवडणुकीत कोणते नगरसेवक नेत्यांचा शब्द प्रमाण मानतात तर कोणते नगरसेवक ‘नोट फॉर ओट’ वर शिक्कामोर्तब करतात, हा चर्चेचा विषय बनला आहे. (तालुका प्रतिनिधी)