शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

उपासमारीमुळे बिबट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2016 11:02 PM

कोल्हार : कोल्हार भगवतीपूर शिवारात सोनगाव रस्त्यावर रामपूर फाट्यानजीक जालिंदर खर्डे यांच्या शेतात रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.

कोल्हार : कोल्हार भगवतीपूर शिवारात सोनगाव रस्त्यावर रामपूर फाट्यानजीक जालिंदर खर्डे यांच्या शेतात रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. साधारणपणे साडेतीन ते चार वर्षे वयाचा व नर जातीचा हा बिबट्या उपासमारीमुळे मृत पावल्याचे शवविच्छेदनानंतर स्पष्ट झाले.कोल्हार भगवतीपूर शिवारात जालिंदर खर्डे यांच्या शेतात बिबट्या पडून असल्याचे बाळा हरि दळे यांनी पाहिले. त्यांनी ताबडतोब आसपासच्या रहिवाशांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, धापा टाकत असताना बिबट्या गतप्राण झाला. कोल्हार बुद्रूकचे उपसरपंच स्वप्नील निबे, भगवतीपूरचे माजी उपसरपंच श्रीकांत खर्डे, पोलीस पाटील सुखलाल खर्डे यांनी या घटनेची वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. शिर्डी विभागाचे वनरक्षक दशरथ झिंजुर्के, राहुरी विभागाचे लक्ष्मण किनकर घटनास्थळी आले.दरम्यान, बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळाली येथील वनचेतना केंद्रात मोटारीतून नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर बिबट्याचा मृत्यू उपासमारीमुळे झाला असल्याचे निदान डॉ. सातपुते यांनी केले.(वार्ताहर)