सरकारच्या प्रतीकात्मक फलकावर चिखलफेक, जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 08:52 PM2024-06-21T20:52:16+5:302024-06-21T20:52:32+5:30

प्रशांत शिंदे, अहमदनगर : शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, दूध दरवाढ नाही. पेपर लीक होत आहे, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. ...

Mud pelting on the symbolic board of the government, agitation of district congress | सरकारच्या प्रतीकात्मक फलकावर चिखलफेक, जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

सरकारच्या प्रतीकात्मक फलकावर चिखलफेक, जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

प्रशांत शिंदे, अहमदनगर : शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, दूध दरवाढ नाही. पेपर लीक होत आहे, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. गुन्हेगारांना बेड्या ठोकण्याऐवजी गृहखाते पाठीशी घालत आहे. राज्य सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले, असा आरोप करत जिल्हा काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक चिखलफेक आंदोलन केले.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, काँग्रेस नेते घनश्याम शेलार, नाजीर शेख, संभाजीराव रोहकले, किरण पाटील, समीर काझी, अरुण म्हस्के, संजय आनंदकर, उत्तमराव नागवडे, संपतराव म्हस्के, डॉ. अमोल फडके, शरद पवार, अंजुम शेख, किशोर तापकीर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

जयंत वाघ म्हणाले, राज्यातील जनता सुरक्षित नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, कांदा, दूध दरवाढीचे प्रश्न प्रलंबित आहे. सरकार भ्रष्ट झाले असून विद्यार्थी, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत.

घनश्याम शेलार म्हणाले की, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. स्पर्धा परीक्षा होत नाही. झालेले परीक्षेत भाजपा पदाधिकाऱ्यांनी पेपर लीक केले आहेत. भ्रष्ट सरकार पायउतार होईपर्यंत आमचे आंदोलन चालूच ठेवू.

Web Title: Mud pelting on the symbolic board of the government, agitation of district congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.