शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
3
"वृद्धांना तरुण करू"; टाईम मशीनच्या जाळ्यात अडकले हजारो लोक, जोडप्याकडून कोट्यवधींचा गंडा
4
Amitabh Bachchan : "मी दिवसाला २०० सिगारेट ओढायचो, पण आता..."; 'असं' बदललं अमिताभ बच्चन यांचं आयुष्य
5
IPO असावा तर असा, लिस्टिंगच्या दिवशीच पैसा दुप्पट; आता Shares खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
7
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
8
दिवसभर भीक मागायचे अन् रात्री हॉटेलात मुक्काम करायचे; २२ भिकाऱ्यांना पोलिसांनी पकडले
9
२ लाख कॅश, ३०० ग्रॅम सोनं, ११ किलो चांदी, १३ प्लॉट...; IAS अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड
10
Iran Isreal Tension : इस्त्रायलचा मारा सहन करू शकेल का इराण; जाणून घ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय आहे स्थिती?
11
"आज कुछ तुफानी करते है!" Martin Guptill चा कडक सिक्सर; फुटल्या कॉमेंट्री बॉक्सच्या काचा!
12
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
13
२००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार काँग्रेसचा माजी पदाधिकारी; कोकेन प्रकरणात मोठा खुलासा
14
Bigg boss 18 मध्ये येणार 'तारक मेहता...'चा सोढी? महिनाभर बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंहचं नाव चर्चेत
15
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
16
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
17
तेलंगणा मंत्र्याचे समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटावर आक्षेपार्ह विधान, अभिनेत्रीची संतप्त पोस्ट
18
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
19
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
20
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...

नवीकोरी पंचायत समिती धूळखात

By admin | Published: August 05, 2016 11:39 PM

हेमंत आवारी, अकोले अकोले: पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या तरी विद्यमान पंचायत समिती सदस्य मंडळाच्या नशिबी नव्या इमारतीत बसण्याचा योग दिसत नाही.

हेमंत आवारी, अकोलेअकोले: पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या तरी विद्यमान पंचायत समिती सदस्य मंडळाच्या नशिबी नव्या इमारतीत बसण्याचा योग दिसत नाही. इमारतीचे उद्घाटन होऊन दोन वर्षे लोटली, परंतु फर्निचर व विद्युतीकरणाचे काम बाकी असल्याने जवळपास तीन कोटींची ही इमारत धूळखात पडून आहे.सन २०१२-२०१७ साठी पंचायत समिती सदस्य मंडळ निवडून आल्यानंतर नव्या इमारतीची पायाभरणी झाली. इमारत बांधकाम कामानिमित्त पंचायत समिती कार्यालय मराठी मुलांच्या शाळेत हलवावे लागले. २०१४ला ३ कोटी रूपये खर्चून आकर्षक वास्तू उभी राहिली. विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर घाईतच इमारतीचे उद्घाटन २३ आॅगस्ट २०१४ ला तत्कालीन पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते झाले. दरम्यान इमारतीच्या अंतर्गत विद्युतीकरणासाठी ३० ते ४० लाख रुपये निधी प्राप्त झाल्यावर औरंगाबादच्या ठेकेदाराने विद्युतीकरणाचे काम सुरु केले होते पण कामाच्या दर्जाचे कारण पुढे होत हे काम बंद पडले. औरंगाबादच्या ठेकेदाराला काम सोडून निघून जावे लागले.नंतर इमारत बांधकाम करणाऱ्या ठेकेदारालाच विद्युतीकरणाचा ठेका मिळाला असून अद्याप कामाचे आदेश निर्गमीत झालेले नाहीत. तसेच दोन वर्षांपासून फर्निचरसाठी पैसे मिळत नसल्याचे कारण होते. आता फर्निचरसाठी ५८ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. तरी अद्याप फर्निचरचे काम सुरु झालेले नाही. तसेच फर्निचरसाठी अधिकचे ४० लाख रुपये मंजूर आहेत. इमारतीत ९८ लाख रुपयांचे फर्निचर होणार असून हे काम दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.तीन कोटीची इमारत, एक कोटीचे फर्निचर, चाळीस लाखांचे विद्युतीकरण असे काम तालुक्यातील एकाच ठेकेदारास मिळून देखिल चार वर्षे इमारतीचे काम पूर्ण न झाल्याबद्दल पंचायत समिती आवारात नाराजीचा सूर उमटत आहे. सध्या पंचायत समितीचा कारभार नारी भवनमध्ये सुरु आहे. महिला सबलीकरणासाठी ही इमारत तयार झाली असून या इमारतीचा वापर तालुक्यातील महिला बचत गटांनी उत्पादीत केलल्या वस्तू विक्रीसाठी होणे अपेक्षित आहे.मात्र तालुक्यातील महिला बचतगट चळवळीतील महिलांना ही इमारत आपल्यासाठी आहे हेच माहीत नाही. पंचायत समितीचा कारभार सध्या विखुरलेल्या ठिकाणाहून सुरु आहे. येथील एका कोपऱ्यात सभापती, उपसभापतींसाठी टेबल ठेवले आहेत. सभापती निवासमध्ये लघू पाटबंधारे विभाग, पंचायत समिती हॉलच्या एका छोट्या खोलीत आरोग्य विभाग, तर गट समूह साधन इमारतीत शिक्षण विभागाचे कामकाज सुरु आहे. नव्या इमारतीचे काम रेंगाळत पडले असून पाच वर्षे पूर्ण होत आले तरी पंचायत समिती सदस्य मंडळाच्या नशिबी नव्या इमारतीत बसण्याचा योग दिसत नाही.नारी भवनमधून पंचायत समितीचे कामकाज सुरळीत सुरु आहे. नव्या इमारतीच्या फर्निचरसाठी ५८ लाख रुपये प्राप्त असून अधिक ४० लाख रुपये मिळणार आहेत. विद्युतीकरणासाठी पहिल्या ठेकेदाराचे काम रद्द झाले असून नवीन ठेकेदारास काम मंजूर झाले. पण कार्यारंभ आदेश मिळालेले नाहीत. विद्युतीकरणासाठी निधी मंजूर आहे. फर्निचर व विद्युतीकरणाचे काम लवकर सुरु होणे अपेक्षित आहे.- अंजना बोंबले, सभापती, पंचायत समिती