शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
3
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
4
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
5
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
6
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
7
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
8
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
9
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
10
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
11
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
12
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
13
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
14
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
15
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
16
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
17
कुटुंबाचे कसे होणार? ही चिंता मिटविण्यासाठी...
18
लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण
19
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

अजित पवारांचा थेट आदिवासी मंत्र्यांना फोन; घरकुलाचा प्रश्न, बर्डे कुटुंबियांची घेतली भेट

By सुदाम देशमुख | Published: October 17, 2022 12:56 PM

नऊ दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळाली नसल्याचे बर्डे कुटुंबियांनी यावेळी सांगितले.

घारगाव (जि. अहमदनगर): संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी अंतर्गत असलेल्या वांदरकडा येथील नाल्यात तुटलेल्या विजवाहक तारेचा वीजप्रवाह पाण्यात उतरला. या नाल्यात आंघोळीसाठी गेलेल्या अनिकेत बर्डे, ओंकार बर्डे, दर्शन बर्डे, विराज बर्डे चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (८ ऑक्टोंबर) दुपारी घडली होती. या या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अकलापूर येथे सोमवारी सकाळी (दि.१७) बर्डे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.    नऊ दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळाली नसल्याचे बर्डे कुटुंबियांनी यावेळी सांगितले. दरम्यान, विरोधी पक्षनेते पवार यांनी बर्डे कुटुंबियांच्या घरकुलासंबंधी संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हे आदिवासी कुटुंब असल्याने शबरी घरकुल योजनेंतर्गत घरकुलासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी सांगितले. याबाबत पवारांनी थेट आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना फोन लावत त्यांना संपूर्ण घटना समजावून सांगतली. नगर जिल्ह्याचे टार्गेट वाढवून या कुटुंबियांसाठी हे दोन घरकुल मंजूर करा अशी मागणी केली. यावेळी विरोधी पक्षनेते पवारांच्या कामाच्या शैलीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. इतर मदतीबाबतही अधिकाऱ्यांना सूचना केल्या.    यावेळी आमदार किरण लहामटे, कॉंग्रेसचे गटनेते अजय फटांगरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर,मनसेचे किशोर डोके,राष्ट्रवादीचे कपिल पवार, मुनीर शेख, कॉंग्रेसचे गौरव डोंगरे, बाळासाहेब कुऱ्हाडे,सरपंच अरुण वाघ,विकास शेळके,बाळासाहेब ढोले,संपत आभाळे,योगेश सूर्यवंशी,विकास डमाळे,पांडू शेळके यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पतसंस्थेत पैसे ठेऊन नका

मिळालेली मदत खर्च न करता मुदत ठेवीत ठेवा. पैसे पतसंस्थेत ठेऊ नका पतसंस्था बुडतात. त्यापेक्षा राष्ट्रीयकृत बँकेत ठेवा अन्यथा शेतकऱ्यांची बँक असलेल्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवा. असा विरोधी पक्षनेते पवारांनी हात जोडून बर्डे कुटुंबियांना सल्ला दिला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार