शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 8:08 AM

तुम्ही चाळीस वर्षे राज्य केले. फुटकी कवडी तरी बहिणींना दिली का?

शिर्डी : विरोधी पक्षाचे नेते सत्तेत आले तर लाडकी बहीण योजना बंद करणार आहेत. एक नेते म्हणाले, पंधराशे रुपयांत काय होते; पण तुम्ही चाळीस वर्षे राज्य केले. फुटकी कवडी तरी बहिणींना दिली का? खबरदार, आमच्या लाडकी बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली, तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही,  असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिला आहे. 

शिर्डीत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ लाभार्थी सन्मान कार्यक्रमात ते शुक्रवारी बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार अशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आदी उपस्थित होते.

ही योजना बंद करायचा विरोधकांचा विचार

फडणवीस म्हणाले, आम्ही योजना सुरू केल्यानंतर काही सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागले. नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार उच्च न्यायालयात गेले. 

आम्ही मोठा वकील उभा केला आणि योजनांवर स्थगिती येऊ दिली नाही; पण सावत्र भावांची नियत बघा. काल-परवा आदित्य ठाकरे म्हणाले, आमचे सरकार येऊ द्या, महायुतीच्या सरकारने घेतलेले सर्व निर्णय आम्ही रद्द करून टाकू. म्हणजे यांच्या डोक्यात लाडकी बहीण योजना बंद करायचा विचार आहे.

काँग्रेसच्या प्रणिती शिंदे म्हणाल्या होत्या, ही योजना म्हणजे बहिणींना दिलेली लाच आहे. अरे काही शरम करा. हा कोणाच्या बापाचा पैसा नाही, जनतेचाच पैसा आहे. त्यांचेच पैसे बहिणींच्या खात्यात टाकतोय, तर बहिणींना लाचखोर म्हणायचा अधिकार आहे का? 

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाshirdiशिर्डीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस