शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2016 11:08 PM

अहमदनगर : वांबोरी येथील श्रीकृष्ण मंदिराच्या शिवारात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी यातील आरोपी आत्माराम यशवंत वाघ याला सोमवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले होते.

अहमदनगर : वांबोरी येथील श्रीकृष्ण मंदिराच्या शिवारात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी यातील आरोपी आत्माराम यशवंत वाघ याला सोमवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले होते. त्याला २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश ए. एन. चौरे यांनी दिले आहेत.वांबोरी येथील श्रीकृष्ण मंदिर आश्रम परिसरात एका अल्पवयीन मुलीवर आत्माराम याने शुक्रवारी (दि. २२) अत्याचार केला होता. मुलीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर रविवारी रात्री त्याला अटक करण्यात आली होती. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. गुन्ह्यातील अत्याचारीत मुलीचे वय १५ वर्षे आहे, याची माहिती असूनही आरोपीने मुलीवर अत्याचार केला. आरोपीने आणखी कुठे नेऊन मुलीवर अत्याचार केला, आरोपीला आणखी कोणी साथीदार आहेत का? याचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. सुरेश लगड यांनी केली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश चौरे यांनी आरोपीला २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी के. शेंगेपल्लू उपस्थित होते. (प्रतिनिधी)