शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

पूजा खेडकर यांच्या जिल्हा रुग्णालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार होण्याचा धोका

By अण्णा नवथर | Published: July 14, 2024 11:49 AM

रुग्णालयातील रेकॉर्डरूम सरकारने सील करण्याची आवश्यकता आहे.

अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातून दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे. तशी नोंद रेकॉर्डरुममध्ये सापडली आहेत. पूजा खेडकरसह इतर अनेकांना या रुग्णालयातूनचं बोगस प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत. तर काही प्रमाणपत्रांंच्या फॉरमॅटबद्दल संशय आहे. सध्या जिल्हा रुग्णालयाची रेकॉर्डरूम येथील अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. हे अधिकारी व कर्मचारी अनेक वर्षांपासून बदले गेलेले नाहीत. त्यामुळे पूजा खेडकर सह इतर कागदपत्रांमध्ये फेरफार होण्याची शक्यता असून रुग्णालयातील रेकॉर्डरूम सरकारने सील करण्याची आवश्यकता आहे.

 वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना 2018 आणि 2020 या दोन वर्षांमध्ये दिव्यांगाची वेगवेगळे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत. तशी माहिती जिल्हा व शल्य चिकित्सक घोगरे यांनी माध्यमांशी बोलताना शनिवारी दिले. तशी नोंद रेकॉर्ड रूममधील रजिस्टरमध्ये सापडली आहे. हे सर्व अभिलेख जिल्हा रुग्णालयातील रॉकार्ड रूम मध्ये आहेत. ही रुम सध्या जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात आहे. यापूर्वीही जिल्हा रुग्णालयातून बोगस प्रमाणपत्र दिले गेल्याची समोर आलेले आहे. कागदपत्रांमध्ये फेरफार करून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिले तर काही वेळा डमी उमेदवार उभे करूनही प्रमाणपत्र वाटलेले आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. 

जिल्हा रुग्णालयातील कारभाराकडे आरोग्य मंत्री तसेच आरोग्य मंत्रालय यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून खेडकर यांच्यासह घोटाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केले जाऊ शकतो. बोगस प्रमाणपत्र दिल्याच्या अनेक तक्रारी आहेत. मध्यंतरी शिक्षकांनाही चुकीच्या पद्धतीने दिव्यांगांची प्रमाणपत्र दिले गेले आहेत. या प्रकरणाची ही चौकशी सुरू आहे. जिल्हा रुग्णालयातील बोगस प्रमाणपत्रांबाबतच्या आजवरच्या तक्रारी पाहता वादग्रस्त आयएएस अधिकारी खेडकर यांच्या कागदपत्रांमध्ये फेरबदल केले जाऊ शकतात. त्यामुळे हा विभाग राज्य सरकारने ताब्यात घेऊन सील करण्याचे आवश्यकता आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर