शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
2
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
3
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
4
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
5
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
6
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
7
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
8
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
9
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
10
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
11
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
12
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
13
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
14
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
15
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
16
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
17
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
18
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
19
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

पावसाचा जोर कायम

By admin | Published: August 27, 2014 11:07 PM

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात गेल्या सोमवारी सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारीही कायम होता़

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात गेल्या सोमवारी सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारीही कायम होता़ जिल्ह्यात मंगळवारी ११ मि़मी़ पाऊस झाला असून, बुधवारी मुसळधार पावसाने नगरकरांना झोडपून काढले़गेल्या दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली़ गेल्या सोमवारी सायंकाळी प्रथमच १४० मि़मी़ पाऊस झाला़ पारनेर वगळता सर्वत्र हा पाऊस झाला असून, संगमनेर व श्रीरामपूर शहरात सर्वाधिक पाऊस झाला़ दुसऱ्या दिवशी मंगळवारी शहरासह जिल्ह्यात ११़ ९७ मि़ मी़ पावसाची नोंद झाली़ राहुरी तालुक्यांत सर्वाधिक ४२़४ मि़ मी़ पाऊस झाला़ नगर तालुक्यातही ३२ मि़मी़ पाऊस झाला असून, कोपरगाव परिसरात ३३ मि़ मी़ पाऊस झाला आहे़याशिवाय शेवगाव, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यांत मंगळवारी पाऊस झाला़ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे़ तिसऱ्या दिवशी बुधवारीही नगर शहरासह तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला आहे़पावसाचा जोर वाढत असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे़शहरात दुपारी मुसळधार पाऊस झाला़ शहरातील सावेडी, बालिकाश्रम रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोठला, सर्जेपुरा, माळीवाडा, सारसनगर, केडगाव, नालेगाव, गुलमोहर रस्ता, निर्मलननगर, महापालिका कार्यालय परिसर, मुकुंदनगर परिसरात मुसळधार पाऊस झाला़ याशिवाय जिल्ह्यातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे़ पावसाचा जोर वाढतच असून, बुधवारी राहुरी तालुक्यातील गुहा सोनगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला़ मुळा लाभ क्षेत्रातील खरीप पिकांसाठी सुरू झालेले आवर्तनही पावसामुळे बंद करण्यात आले आहे़ लाभक्षेत्रात काही ठिकाणी झालेल्या पावसाचा आढावा घेऊन पाटबंधारे विभागाने आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे़ पावसामुळे मुळाचे दोन्ही कालवे बंद१मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या तीन दिवसांत समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने शेतीसाठी सोडलेले आवर्तन बंद करण्यात आले आहे. मुळाचा उजवा व डावा असे दोन्ही कालवे बंद झाल्याने ६००० दशलक्ष घनफूट पाणी वाचणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. २खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांच्या मागणीवरून मुळा धरणाचे आवर्तन गेल्या तीन दिवसांपूर्वी सोडले होते. परंतु त्यानंतर लगेच लाभक्षेत्रावर वरूणराजाने कृपादृष्टी दाखवल्याने पिकांचे भरणे आपोआप झाले. परिणामी दोन्ही कालवे बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला़ ३२६००० दलघफू पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात बुधवारी रात्री २०६२५ दलघफू पाणी साठ्याची नोंद झाली़ धरणाकडे २२४७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. पाणलोट क्षेत्रावर गेल्या दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही़ बुधवारी दुपारी पाणलोट क्षेत्रावर पाऊस सुरू होता़ सायंकाळीही हलक्या सरी पडल्या. कोतूळ येथे ९, तर मुळानगर येथे ४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ ३० आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज महात्मा फु ले कृषी विद्यापीठाचे हवामान विभाग प्रमुख डॉ़ रवींद्र आंधळे यांनी व्यक्त केला़ जिल्ह्यातील टँकरच्या संख्येत घटपावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे़ परंतु नुकत्याच झालेल्या पावसामुळे टँकरची संख्या कमी झाली आहे़ पाऊस झालेल्या परिसरातील टँकर बंद करण्यात आले आहेत़ मागील आठवड्यात ३३३ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू होता़ सोमवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसामुळे विविध गावांतील टँकर कमी करण्यात आले असून,टँकरची संख्या २८० झाली आहे़ नुकत्याच झालेल्या पावसामुळे ५३ टँकर कमी झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविले आहे़कुठे किती पाऊसअकोले- ९ संगमनेर-१, कोपरगाव-३३, राहुरी- ४२़२, नेवासा- १, नगर- ३२, शेवगाव- १२, पाथर्डी- १६, पारनेर- १३, कर्जत- २, जामखेड- ६़२