शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
3
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
4
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
5
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
6
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
7
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
8
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
9
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
10
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
11
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
12
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
13
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
14
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
15
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
16
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
17
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
18
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
19
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
20
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 

रामदास आठवलेंच्या रिपाइंत फूट, गायकवाड यांनी केली नव्या पक्षाची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 9:15 PM

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यासह भाजपावर नाराजी व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी आफ इंडियाचे प्रदेश सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी पक्षाचा राजीनामा देत युनायटेड रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

अहमदनगर : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यासह भाजपावर नाराजी व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी आफ इंडियाचे प्रदेश सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी पक्षाचा राजीनामा देत युनायटेड रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्याची घोषणा केली आहे.गायकवाड यांनी सोमवारी पत्रकारपरिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले, तडजोडीच्या राजकारणात रिपाइं पक्ष भाजपाबरोबर गेला. भाजपाने मात्र आंबेडकरी जनतेला काहीच दिले नाही. सत्तेत दहा टक्के वाटा देण्याचे आश्वासन त्यांनी पाळले नाही. केवळ भावनिक राजकारण करून दलित समाजाची गेल्या चार वर्षांपासून फसवणूक सुरू आहे. दलित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. राज्यासह देशात दलितांसह अल्पसंख्याक समाजावर अन्याय सुरू आहे. भाजपाने भीमा कोरेगाव दंगलीत दलित-मराठा समाजात विष पेरण्याचे काम केले. धनगर, मराठा व मुस्लिम आरक्षणांबाबतही केवळ आश्वासन देऊन प्रत्यक्षात काहीच कृती केली नाही. या पक्षात काम करत असताना माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांची गेल्या काही दिवसांपासून घुसमट होत होती. पक्षात राहून सर्वसामान्य जनतेसाठी ठोस काम करता येत नसेल तर तेथे राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही़ खुद्द रामदास आठवलेही भाजप सरकारच्या अनेक निर्णयावर नाराज आहेत़ एस्सी, एसटी कायद्याला कमजोर करण्याचा निर्णय घेणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या निवृत्तीनंतर त्यांना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणचे अध्यक्ष म्हणून या सरकारने नियुक्ती दिली़ भाजपाच्या या दलितविरोधी भूमिकेमुळेच पक्ष सोडत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले़ यावेळी विनोद भिंगारदिवे, नाना पाटोळे, दीपक साळवे, यशवंत भांबाळ आदी उपस्थित होते.

पक्षातील दीडशे पदाधिकारी बाहेर पडणार

नाशिक येथे ४ आॅगस्ट रोजी अशोक गायकवाड यांच्यासह इतर समविचारी कार्यकर्ते आणि संघटना एकत्र येऊन ‘युनायटेड रिपब्लिकन’ पक्षाची स्थापना करणार आहेत. यावेळी रिपाइंमधील सुमारे १५० पदाधिकारी बाहेर पडून नवीन पक्षात सहभागी होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

पवारांची भेट-नवे राजकीय समिकरण

रिपाइंमधून बाहेर पडणाऱ्या गायकवाड यांच्यासह काही पदाधिका-यांनी नुकतीच पुणे येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. नवीन युनायटेड रिपब्लिकन पक्ष आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लढविणार आहे. त्यामुळे येणा-या काळात नवीन राजकीय समिकरणे जुळून येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRamdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपा