शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

नगरमध्ये टळली पालघरची पुनरावृत्ती; नरबळीच्या संशयाने महिलेसह तिघांवर हल्ला; अवघ्या दोन पोलिसांनी रोखले संतप्त जमावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 4:32 PM

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे गैरसमजुतीतून झालेले साधूंचे हत्याकांड ताजे असतानाच नगर तालुक्यातील विळद येथेही गुरुवारी (दि.१४) रात्रीही असाच प्रसंग तिघा मजुरांवर ओढवला. नरबळीच्या संशयातून संतप्त झालेल्या जमावाने महिलेसह इतर दोघांना घेराव घालून त्यांच्यावर हल्ला चढविला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक पवन सुपनर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला रोखून चौघांची त्यांच्या तावडीतून सुटका केली.

अरुण वाघमोडे / अहमदनगर : पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे गैरसमजुतीतून झालेले साधूंचे हत्याकांड ताजे असतानाच नगर तालुक्यातील विळद येथेही गुरुवारी (दि.१४) रात्रीही असाच प्रसंग तिघा मजुरांवर ओढवला. नरबळीच्या संशयातून संतप्त झालेल्या जमावाने महिलेसह इतर दोघांना घेराव घालून त्यांच्यावर हल्ला चढविला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक पवन सुपनर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला रोखून चौघांची त्यांच्या तावडीतून सुटका केली. पोलीस अधिकाºयाच्या सतर्कतेमुळे विळद येथे पालघरची पुनरावृत्ती टळली.पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे पतीपासून वेगळे राहत असलेली महिला तिच्या दोन वर्षांच्या मुलासह प्रियकरासोबत पाच दिवसापूर्वी विळद येथे आली होती. या दोघाबरोबर एक तरुणही होता. नगरमध्ये येताना या तिघांनी प्रशासनाची परवानगी घेतलेली नव्हती. त्यांना एमआयडीसी येथील एका कंपनीत काम मिळाले होते. विळद गावातील वस्तीवर अशोक वराळे यांचे घर या मजुरांनी राहण्यासाठी घेतले होते. या घराशेजारी टॉयलेट बांधण्यासाठी एक शोषखड्डा खोदलेला होता. चार-पाच पाच दिवसांपासून तीन अनोळखी वस्तीवर येऊन राहत असून त्यांच्याकडे एक मुलगा आहे. अशी चर्चा विळद परिसरात सुरू झाली. तर हे मजूर राहत असलेल्या घराजवळ एक खड्डाही खोदलेला आहे. ‘नरबळीचा काहीतरी प्रकार आहे’ अशा चर्चा आणि अफवांना उधाण आले. या अफवा आणि गैरसमजुतीतूनच गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास लाठ्या-काठ्या घेऊन जमाव विळद येथील वस्तीवर मजूर राहत असलेल्या घराजवळ येऊन धडकला. यावेळी मजूर महिलेचा दोन वर्षाचा मुलगा घरात झोपलेला होता. जेवण करून शांतपणे झोपलेल्या मुलाला तुम्ही बेशुद्ध केले असून त्याचा आता घराजवळ खोदलेल्या खड्ड्यात नरबळी देणार आहात, असा गैरसमज करून घेत जमावाने महिला व तिच्यासोबत असलेल्या दोघा पुरुषांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. ते तिघे ओरडून आणि विनवणी करून सांगत होते. आम्ही मजूर आहोत, रोजीरोटीसाठी येथे आलो आहोत आणि हा मुलगा माझाच आहे ....पण जमाव काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरम्यान ही घटना गावात सर्वत्र पसरली. या घटनेबाबत काही ग्रामस्थांनी एमआयडीसी पोलिसांना फोन करून माहिती दिली. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक पवन सुपनर व पोलीस नाईक परशुराम नाकाडे हे दोघे जण तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. संतप्त झालेल्या जमावाला सुपनर व नाकडे यांनी मोठ्या प्रयासाने शांत केले. त्या महिलेची आणि दोन पुरुषांची सविस्तर चौकशी केली. महिलेकडून फोन नंबर घेऊन तिच्या आई-वडिलांशी व्हिडिओ कॉल करून संपर्क केला. तेव्हा तिच्या नातेवाइकांनीही सांगितले की, सदर महिला ही आमचीच मुलगी आहे. तिच्यासोबत असलेला दोन वर्षाचा मुलगा हा तिचाच आहे. त्यानंतर जमावाची खात्री पटली आणि वातावरण शांत झाले.महिलेला दाखल केले विलगीकरण कक्षातपुणे जिल्ह्यातून लॉकडाऊनचे उल्लंघन करून नगरमध्ये आल्याप्रकरणी सदर मजूर महिला व तिच्या मुलाला विळद येथील निवारा कक्षात पोलिसांनी क्वारंटाईन केले आहे. तिचा प्रियकर राहुल द्वारकादास बियाणी, सोबत असलेला तरुण विश्वास धोंडिबा दंडवते, त्यांना काम देणारा एमआयडीसीतील कंपनीचा मालक सुधाकर विनायक गावडे व विळद येथे त्यांना राहण्यासाठी घर देणारा अशोक भिकाजी वराळे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुर्दैव तिची पाठ सोडेनापदरात दोन वर्षाचा गोजिरवाना मुलगा असताना सासरी नवरा छळत असल्याने ‘ती’ महिला रोजीरोटीसाठी प्रियकरासोबत नगरमध्ये आली. येथे तिच्यावर तिच्याच मुलाचा नरबळी देण्याचा आरोप झाला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचले. मात्र दुर्दैव तिचे पाठ सोडायला तयार नाही असेच या घटनेवरून सिद्ध होत आहे.साहेब... तुम्ही देवासारखे धावलातसदर महिला व दोघा तरुणांना जमावाने घेरल्यानंतर सहाय्यक निरीक्षक पवन सुपनर हे पोलीस नाईक नाकाडे याना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. संतप्त झालेल्या जमावाला त्यांनी रोखले. पोलीस वेळेस दाखल झाले नसते तर अनर्थ ही घडू शकला असता. जमावाच्या तावडीतून सुखरुप सुटका झाल्यानंतर या मजुरांनी ‘साहेब तुम्ही देवासारखे धावलात’ अशी भावना व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी