शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

पालिकांना ३८ कोटींचा गोपाळकाला

By admin | Published: August 25, 2016 11:35 PM

मिलिंदकुमार साळवे, अहमदनगर चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या दहीहंडीतून अहमदनगर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नवनिर्मित नगरपंचायतींना सुमारे ३८ कोटी रूपयांचा घसघशीत असा गोपाळकाला मिळाला आहे.

मिलिंदकुमार साळवे, अहमदनगरचौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या दहीहंडीतून अहमदनगर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नवनिर्मित नगरपंचायतींना सुमारे ३८ कोटी रूपयांचा घसघशीत असा गोपाळकाला मिळाला आहे.गोकुळाष्टमीची दहीहंडी फुटली जात असतानाच राज्य सरकारने चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीची दहीहंडी बुधवारी फोडली. त्यातून अहमदनगर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींना अनुदानाचा गोपाळकाला मिळाला. अहमदनगर महानगरपालिकेच्या वाट्याला सर्वात जास्त १३ कोटी ५६ लाख १३ हजार ४२५ रुपयांचे अनुदान मिळाले आहे. चौदाव्या केंद्रीय आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील मूलभूत अनुदानाच्या पहिल्या हप्त्याचे वाटप राज्य सरकारने बुधवारी केले. त्यानुसार महाराष्ट्रातील ड वर्ग महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना ८२४ कोटी ७४ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. हा निधी कशा पद्धतीने खर्च करायचा, याबाबत नंतर स्वतंत्रपणे सूचना देण्यात येणार आहेत. या अनुदानातून खर्च करताना सरकार याबाबत जारी करणार असलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार खर्च करणे बंधनकारक राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या निकषाच्या आधारे मूलभूत अनुदानाचा हा पहिला हप्ता देण्यात आला. हा निधी पालिका संचालनालयाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे़नगर महापालिकेला १३ कोटी तर श्रीरामपूरला ३ कोटी मिळणारजिल्ह्यात अहमदनगर महानगरपालिकेस सर्वाधिक १३ कोटी ५६ लाख १३ हजार ४२५ रूपये तर नगरपालिकांमध्ये सर्वाधिक ३ कोटी ३७ लाख ९१ हजार ७७७ रूपये श्रीरामपूर नगरपालिकेस मिळाले आहेत. संगमनेर पालिकेस २ कोटी ६१ लाख १४ हजार ६७२, कोपरगाव पालिकेस २ कोटी ५१ लाख ९६ हजार ६६८७, श्रीगोंदा पालिकेस २ कोटी २० लाख ९६ हजार २८३, नवनिर्मित शेवगाव पालिकेस २ कोटी १६ लाख ४ हजार ३४७, जामखेड पालिकेस २ कोटी २६ लाख ७० हजार ८१२, राहुरी पालिकेस १ कोटी ९५ लाख ९५१, राहाता-पिंपळस पालिकेस १ कोटी ९ लाख ६२ हजार ५०२, शिर्डी नगरपंचायतीस १ कोटी ४७ लाख ९४ हजार ६९१,पारनेर नगरपंचायतीस १ कोटी १६ लाख ९८ हजार ७७ रूपये, कर्जत नगरपंचायतीस १ कोटी २९ लाख ८५ हजार ४३२, अकोले नगरपंचायतीस ८९ लाख ४८ हजार ९८३ मिळतील.