शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

संध्या, भावना, मधू ठरल्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी

By admin | Published: April 23, 2016 1:06 AM

अहमदनगर : लोकमत सखी मंच व कोहिनूर वस्त्रदालन आयोजित सखी महोत्सव’ यामध्ये संध्या पावसे या फॅन्सी क्वीन, भावना केदार या ब्रायडल क्वीन तर मधू बोरा या मँगो क्वीन ठरल्या.

अहमदनगर : लोकमत सखी मंच व कोहिनूर वस्त्रदालन आयोजित सखी महोत्सव’ यामध्ये संध्या पावसे या फॅन्सी क्वीन, भावना केदार या ब्रायडल क्वीन तर मधू बोरा या मँगो क्वीन ठरल्या.उर्वरित निकाल - फॅन्सी क्वीन- द्वितीय- शिल्पा मुथ्था, तृतीय- पल्लवी शिंगी.ब्रायडल क्वीन- द्वितीय- वर्षा पितळे, तृतीय- सारिका परदेशी.मँगो क्वीन- द्वितीय- सविता रहाडे, तृतीय- ज्योती केतकर यांनी बक्षिसे मिळविली.तसेच यावेळी ज्युनि. अमिताभ यांनी सखींचे मनोरंजन केले. ‘कौन बनेगा करोडपती’, फनी गेम्स, प्रश्नोत्तरे यामधून शिल्पा भंडारी, शीतल चौधरी, ज्योती बोरा, सीमा गुगळे, कल्पना जाधव या सखींनी बक्षिसे मिळविली.कार्यक्रमाची सुरुवात लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी राखी मुनोत, मंदा पोळ या उपस्थित होत्या. या महोत्सवांतर्गत विविध स्पर्धांमध्ये सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. फॅन्सी क्वीन या स्पर्धेत रेखा, श्रीदेवी, जया प्रदा, जया भादुरी, हेमा मालिनी, झिनत अमान, मुमताज अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची वेशभूषा सखी स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सादर केली. तर मँगो क्वीनमध्ये कैरीचे सरबत, पन्हे, कैरीची डाळ, लोणचे, पुलाव, चटणी असे अनेक पदार्थ सखींनी करून दाखविले होते तर ब्रायडल क्वीन मध्येही महाराष्ट्रीयन, पंजाबी, गुजराती अशा नववधू सखी स्पर्धकांनी सुंदररित्या सजविल्या होत्या. सर्व स्पर्धांचे परीक्षण नंदा सोमाणी, आदिती सिन्हा, विद्या बडवे यांनी केले.सोबतच ज्युनि. अमिताभ यांनी सखींना बागबान, दिवार, नमक-हलाल, सूर्यवंशम्, हम, जंजीर, शोले, डॉन, शराबी, मोहब्बते अशा अनेक गाजलेल्या चित्रपटातील डायलॉग्ज, गाणे सादर करून सखींची वाहवा मिळविली. अगदी हुबेहूब अमिताभ बच्चन यांचा आवाज काढून सखींना मनमुराद हसविले. सखींनीही विविध गीतांवर ठेका धरला.विजेत्या सखींना प्रभात डोमेस्टिक अप्लायन्सेस यांच्यातर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरण अ‍ॅड.वृषाली तांदळे, ज्युनि. अमिताभ, नंदा सोमाणी, आदिती सिन्हा, विद्या बडवे यांच्या हस्ते झाले. प्रीती संचेती, भारती गुंदेचा, प्राजक्ता रासने, अलका मुंदडा, शिल्पा भंडारी, बबिता गांधी, गुंजन भंडारी यांनी सहकार्य केले. या महोत्सवात आशा भोसले, सविता रहाडे, डॉ.रश्मी आरडे, माधुरी हारदे, कल्पना कडव या पाच सखींना गायनाची संधी देण्यात आली होती.(प्रतिनिधी)