शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

सराफांचा पुन्हा आजपासून संप

By admin | Published: April 24, 2016 10:54 PM

अहमदनगर : केंद्र सरकारने सराफ व्यावसायिकांवर लावलेल्या अबकारी कराच्या निषेधार्थ देशातील सराफ -सुवर्णकार व्यावसायिकांनी १ मार्चपासून देशव्यापी संप पुकारला होता.

अहमदनगर : केंद्र सरकारने सराफ व्यावसायिकांवर लावलेल्या अबकारी कराच्या निषेधार्थ देशातील सराफ -सुवर्णकार व्यावसायिकांनी १ मार्चपासून देशव्यापी संप पुकारला होता. सरकारने यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने १३ एप्रिल रोजी हा संप तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. सरकारने मात्र, अबकारी कायद्याबाबत कोणतेही तडजोड केली नसल्याने सोमवारपासून पुन्हा तीन दिवसांचा राष्ट्रीय बंद करण्यात येणार असल्याचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी शनिवारी नगर येथे झालेल्या बैठकीत स्पष्ट केले़ फेडरेशनचे सचिव सुधाकर टाक, प्रेम धावड, उपाध्यक्ष सचिन आंबिलवादे, खजिनदार, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष गणेश बेद्रे आदी उपस्थित होते. यावेळी रांका म्हणाले, १ मार्चपासून पुकारलेल्या संपाला संपूर्ण देशातील सराफ व्यावसायिकांनी एकजूट दाखवून मोठा पाठिंबा दिला. १० दिवसांकरीता तात्पुरता हा संप स्थगित करण्यात आला होता. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे द्वितीय सत्र २५ एप्रिलपासून सुरू होत आहे. या बजेट सत्रात चर्चा होणार असून सर्व विरोधी पक्षाचे खासदार, शिवसेनेचे २१ खासदार व भाजपामधीलही काही खासदार चर्चेदरम्यान या अबकारी करास तीव्र विरोध करणार आहेत. त्यामुळे सरकारने लादलेल्या हा अबकारी कर मागे घ्यावाच लागणार आहे. या अबकारी कराच्या निषेधार्थ पुन्हा सराफ सुवर्णकार व्यावसायिक २५,२६,२७ एप्रिल दरम्यान तीन दिवसांचा राष्ट्रीय संप पाळणार आहेत. तसेच सराफ सुवर्णकार व्यावसायिकांची ताकद दाखविण्याकरिता २५ एप्रिल रोजी संसदेवर सराफ सुवर्णकारांचा महामोर्चा धडकणार असल्याचे त्यांनी सांगितले़ या तीन दिवसीय संपात नगरमधील सराफही सहभागी होणार आहेत़ (प्रतिनिधी)