शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

पाणलोटात मुसळधार

By admin | Published: August 02, 2016 11:59 PM

राजूर/अकोले : अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासह अनेक गावांना अतिवृष्टीचा तडाका बसला असून, भंडारदरा पाणलोटातील रतनवाडी येथे विक्रमी

राजूर/अकोले : अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासह अनेक गावांना अतिवृष्टीचा तडाका बसला असून, भंडारदरा पाणलोटातील रतनवाडी येथे विक्रमी १९ इंचाहून अधिक पाऊस पडला. यासह गेल्या दहा वर्षांपूर्वीचे रेकॉर्डही ब्रेक झाले आहे. सोमवारी सायंकाळपासून पश्चिम पट्टयातील जनजीवन विस्कळीत झाले आहे दिवसभर कोसळत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील ठिकठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. अतिवृष्टीच्या या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी शेतजमिनीचे नुकसान झाले असून दिवसभरात पडत असलेल्या धुवाँधार पावसामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरण ८५ टक्के भरले आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत धरण भरण्याची शक्यता आहे. हरिश्चंद्रगड परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुळा नदीला मोठा पूर आला आहे तर तालुक्यातील इतर नद्याही दुथडी भरून वाहत आहेत सोमवारी सायंकाळपासून भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोटात मुसळधार पावसाच्या सरी कोसळू लागल्या. रात्रभरात तर या पट्ट्यात पावसाचे तांडवच सुरु झाले आणि परिसराला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला. या पावसामुळे ओढ्यानाल्यांनाही दिवसभर पूर होता. रतनवाडी खालोखाल घाटघर येथेही १२ इंच म्हणजेच २९९ मि.मी पावसाची नोंद झाली. यामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यातही विक्रमी वाढ होत आहे. सोमवारी सायंकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंतच्या बारा तासांत ८७० द.ल.घ.फू नव्याने पाणी आले. मंगळवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या बारा तासांत १ हजार २१३ द.ल.घ.फू पाणी नव्याने आले. म्हणजे चोवीस तासांत तब्बल २ हजार ८३ द.ल.घ.फू नवीन पाणी आले आणि पाणीसाठा सायंकाळी सहा वाजता ९ हजार ३६८ द.ल.घ.फू इतका झाला. अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे सर्व परिसर जलमय झाला असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांतील शिखर स्वामिनी कळसूबाईच्या परिसरातही अतिवृष्टीचा तडाका बसला यामुळे प्रवरेची उपनदी कृष्णावंतीबरोबरच ओढ्यानाल्यांनाही मोठा पूर आलेला आहे. त्या बरोबरच भंडारदरा पाणलोटाच्या खालच्या पट्टयातही धुवाँधार पाऊस होत असल्यामुळे रंधा येथील धबधब्यालाही विक्राळ रूप आले आहे. यामुळे निळवंडे धरणातील पाणीसाठ्यातही वेगाने वाढ होत पाणीसाठा सुमारे ५०% च्या जवळ पोहचत तो ४ हजार ३६ द.ल.घ.फू झाला. मुळा खोऱ्यातील आजोबा पर्वताच्या परिसरातील हरिश्चंद्र पट्टयातही दिवसभर धुवाधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. सायंकाळी सहा वाजता लहीत येथील मुळेचा विसर्ग तब्बल ५६ हजार ७६ क्युसेक इतका झाला होता. सायंकाळी सहा वाजता मुळा धरणातील पाणीसाठा १५९४० दलघफू झाला होता.(प्रतिनिधी)