शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

कोपर्डीत माध्यमिक शिक्षणाची सुविधा हवी

By admin | Published: July 24, 2016 11:50 PM

कोपर्डी : कोपर्डी येथील मुलांना माध्यमिक शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. त्यामुळे गावातच ही सुविधा उपलब्ध झाल्यास मुलींची सोय होईल, अशी मागणी गावकऱ्यांनी रविवारी आमदार कपिल पाटील यांच्याकडे केली.

कोपर्डी : कोपर्डी येथील मुलांना माध्यमिक शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. त्यामुळे गावातच ही सुविधा उपलब्ध झाल्यास मुलींची सोय होईल, अशी मागणी गावकऱ्यांनी रविवारी आमदार कपिल पाटील यांच्याकडे केली. कोपर्डीच्या ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन यावेळी पाटील यांनी दिले. पाटील यांनी अत्याचारीत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. घटना अत्यंत दुर्दैवी असून हा प्रकार पुन्हा राज्यात होऊ नये, यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवर मुलींच्या संरक्षणासाठी कायदा करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आपण सरकारकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. कोपर्डीतील मुलांना सातवीनंतर शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गावातच ही सुविधा हवी आहे, याकडे गावातील लालासाहेब सुद्रीक, झुंबर सुद्रीक व गौतम सुद्रीक यांनी त्यांचे लक्ष वेधले. यासंदर्भात गावकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे त्यांनी सांगितले. कुठल्याही गुन्हेगाराला जात-धर्म नसतो. त्यामुळे अशा घटनांप्रसंगी सर्व समाजाने एकत्र राहून गुन्हेगारांना शासन होण्याची मागणी करायला हवी. एकमेकांची मने कलुषित न करता सामाजिक सलोखा जपावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत लोकभारतीचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. आदिनाथ शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्राचार्या वर्षाताई निकम, हमाल पंचायतचे नेते अविनाश घुले, बाबा अरगडे, अंनिसच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. रंजना गवांदे, पॉल भिंगारदिवे, अ‍ॅड. जॉन खरात, राजा कांदळकर, नवनाथ गेंड, दिनेश खोसे, फैय्याज इनामदार, प्रफुल्ल ओव्हळ उपस्थित होते.