शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

श्रीगोंद्याला मिळणार कमी पाणी

By admin | Published: April 24, 2016 10:59 PM

श्रीगोंदा : कुकडी कालवा दुरुस्तीचे काम पुर्ण झाले आहे़ त्यामुळे सोमवारपासून कुकडीचे आवर्तन टेलकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़

श्रीगोंदा : कुकडी कालवा दुरुस्तीचे काम पुर्ण झाले आहे़ त्यामुळे सोमवारपासून कुकडीचे आवर्तन टेलकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ मात्र, श्रीगोंदा तालुक्यातील पाणी कमी करण्यात येणार असून, श्रीगोंदा येथील तलाव भरणेही पाच दिवस लांबणीवर पडणार आहे़ आमदार राहुल जगताप, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जि़ प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी, तहसीलदार वंदना खरमाळे, गटविकास अधिकारी अलका शिरसाठ यांनी रविवारी विसापूर तलावातील जलसाठ्याची पाहणी केली़ टंचाई आराखड्याबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या़ आमदार जगताप म्हणाले, जादा तलावात पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेत कार्यवाही सुरू झाली आहे़ श्रीगोंदा शहरालगत असलेल्या लेंडीनाल्यात कुकडीचे पाणी आल्याने शहरातील कूपनलिका आठवडाभरात चालु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ त्यामुळे पाण्याच्या विवंचनेतून शहरवासियांचा जीव भांड्यात पडला आहे़२३७ रोहित्रांची वीज तोडणारकुकडीच्या पाण्याने भरलेले तलाव मुख्य कालवा परिसरातील ५०० मीटरपर्यंतच्या अंतरातील रोहित्रांचा वीज पुरवठा तोडण्यात येणार आहे़ यामध्ये सुमारे २३७ रोहित्रांचा समावेश आहे़ कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही़ त्यामुळे कुकडी कालव्यावरील बेकायदा पाईपलाईन टाकणाऱ्यावर जलसंपदा विभागाने ठोस कारवाई करणे महत्वाचे आहे़-अनिल कवडे, जिल्हाधिकारीजिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश वडाळी शिवारात कुकडी कालवा फोडून काही बड्या नेत्यांनी थेट कालव्यातून पाईपलाईन केल्याच्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आदेश कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी,ख तहसीलदार वंदना खरमाळे यांना दिले़ कुकडी कालवा फोडून बेकायदेशीर पाईपलाईन टाकल्याप्रकरणी जलसंपदा विभागाने यापूर्वीच अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे़पारगाव सुद्रीक येथील तलाव भरलापारगावचे ग्रामदैवत सुद्रिकेश्वर महाराजांच्या यात्रौत्सवात भाविकांच्या पाण्याची सोय होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाने केलेल्या ठरावाची दखल घेत प्रशासनाने पारगावचा तलाव भरला आहे़