शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
4
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
5
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
6
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
7
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
8
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
9
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
10
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
11
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
12
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
13
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
14
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
15
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
16
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
17
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
18
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
19
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
20
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल

अ‍ॅनिमल वेस्ट पुरण्याचे काम सुरू

By admin | Published: August 12, 2016 11:54 PM

अहमदनगर : बुरुडगाव रोडवरील कचरा डेपोमध्ये अनाधिकृतरित्या टाकलेले अ‍ॅनिमल वेस्ट पुरण्याचे काम शुक्रवारी सकाळपासून सुरू झाले. तांत्रिकपद्धतीने प्राण्यांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्यात येत आहे.

अहमदनगर : बुरुडगाव रोडवरील कचरा डेपोमध्ये अनाधिकृतरित्या टाकलेले अ‍ॅनिमल वेस्ट पुरण्याचे काम शुक्रवारी सकाळपासून सुरू झाले. तांत्रिकपद्धतीने प्राण्यांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्यात येत आहे. तसेच अस्ताव्यस्त पडलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे कामही सुरू झाले.पुणे येथील हरित न्यायाधिकरणाने (लवाद) दिलेल्या आदेशान्वये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले. प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे, आयुक्त दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त भालचंद्र बेहेरे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, डॉ. एन. एस. पैठणकर, आर.जी. मेहेत्रे, आर. जी. सातपुते यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कचरा डेपोच्या जागेत अनेक वर्षांपासूनचा कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे. काही कचरा कुजला आहे, तर काही कचरा जळून गेला होता. या कचऱ्यावर प्रक्रिया होणे आवश्यक होते. मात्र कोणताही प्रक्रिया न करता तो तसाच पडून होता. खड्डे खोदून त्यामध्ये कचरा टाकणे, मातीत मिसळणे आणि त्याला भुसभुशीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनाधिकृत कत्तलखाने मोठ्या प्रमाणावर प्राण्यांचे अवशेष आणून टाकत आहेत. ते अवशेष मातीत गाडून टाकण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी औषधांचाही वापर करण्यात आला आहे. तसेच डेपो परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे. दोन ते तीन दिवसात कचरा उचलण्याचे काम सुरू राहणार आहे. सावेडी कचरा डेपोतही याचपद्धतीने कचरा उचलण्याचे काम सुरू झाले.दरम्यान कोणीही अ‍ॅनिमल वेस्ट कचरा डेपोत टाकणार नाही, याबाबत दक्षता घेण्यासाठी डेपोच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, अशी माहिती उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी दिली. तसेच डेपोमध्ये रात्रपाळीसाठी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)