शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

शिक्षक पुरस्कार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात, १४ शिक्षकांसह एका केंद्रप्रमुखाची होणार निवड

By चंद्रकांत शेळके | Published: August 10, 2023 10:55 PM

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहीनंतर हे पुरस्कार अंतिम होणार आहेत.

अहमदनगर : दरवर्षी शिक्षक दिनी (५ सप्टेंबर) दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. तालुकानिहाय शिक्षकांची लेखी परीक्षा पूर्ण होऊन पडताळणीही झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहीनंतर हे पुरस्कार अंतिम होणार आहेत.

दरवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. ५ सप्टेंबरला (शिक्षक दिनी) या पुरस्काराचे वितरण होते. तालुकानिहाय १ याप्रमाणे १४ शिक्षकांची व एका केंद्रप्रमुखाची निवड पुरस्कारासाठी केली जाते. या पुरस्कारासाठी मागील आठवड्यात लेखी परीक्षा पूर्ण झाली. 

त्यानंतर शिक्षकांची तालुकानिहाय माहिती, तसेच लेखी परीक्षेचे गुण याची गोपनीय माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे पाठवण्यात आली. लवकरच येरेकर या माहितीची पडताळणी करून त्याआधारे गुणवत्तेनुसार प्रत्येक तालुक्यातील एक अशा १४ प्राथमिक शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी आणि एका केंद्रप्रमुखाची निवड करणार आहेत.

या बाबी घेतल्या विचारात...या पुरस्कारासाठी शिक्षकांनी राबवलेले विविध उपक्रम, शैक्षणिक ब्लॉग, वेबसाइटची निर्मिती व त्यावर केलेले लिखाण, मुलांच्या शिक्षणासाठी यू-ट्यूब चॅनेलची निर्मिती, विविध शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक सहल, इस्रो सहल, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेले विविध प्रयोग, इंग्रजी माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी येण्यासाठी केलेले प्रयोग यासह अन्य शैक्षणिक कामगिरीचे मूल्यमापन या पुरस्कारासाठी विचारात घेण्यात आले. यासाठी १०० गुण असून त्यात २५ गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली.

टॅग्स :Teacherशिक्षक