शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

शिक्षक दिन : जिल्हा परिषदेचे शिक्षक पुरस्कार जाहीर

By चंद्रकांत शेळके | Published: September 04, 2022 5:55 PM

 १४ शिक्षक व दोन केंद्रप्रमुखांचा समावेश

अहमदनगर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून प्रत्येक तालुक्यातून एक असे १४ व २ केंद्रप्रमुख असे एकूण १६ पुरस्कार शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे दरवर्षी जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना  जिल्हा पुरस्कार दिले जातात. यात प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक, तसेच दक्षिण व उत्तर असे दोन केंद्रप्रमुख अशा एकूण सोळा पुरस्कारांचा समावेश असतो. यावर्षी जिल्ह्यातून ३९ शिक्षक व ४ केंद्रप्रमुख असे ४३ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी तीन शिक्षक व एक केंद्रप्रमुख यांनी नकार दिला. उर्वरित ३९ प्रस्तावांची पडताळणी शिक्षण विभागाच्या पथकाने त्या त्या शाळेत जाऊन केली. तसेच प्रस्तावाला शंभरपैकी गुणदान केले. त्यानंतर जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेत या शिक्षकांची २५ गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. शेवटी १२५ गुणांमधून १४ शिक्षक व दोन केंद्रप्रमुख यांची नावे अंतिम करून हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे स्वीकृतीसाठी पाठवण्यात आला. विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनंतर या शिक्षकांची नावे शिक्षण विभागाने रविवारी दुपारी जाहीर केली.

तीनही वर्षांचे पुरस्कार वितरण एकत्रितकोरोनामुळे मागील दोन वर्ष केवळ शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले, मात्र त्याचे वितरण सार्वत्रिक कार्यक्रम घेऊन झाले नव्हते. यंदा कोरोनाचे सावट नसल्याने मागील दोन वर्षांचे व यंदाचे असे तीनही वर्षांचे पुरस्कार वितरण सार्वत्रिकरित्या येत्या पंधरा दिवसात होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली.

तालुकानिहाय पुरस्कार प्राप्त शिक्षक असेसंतोष सदगीर (जि. प. शाळा, अंबड, ता. अकोले), अशोक शेटे (खांडगाव, संगमनेर), सुदाम साळुंके (गिरमेवस्ती, कोपरगाव), भीमराज शेळके (पिंपरी लोकाई, ता. राहाता), तरन्नुम खान (बेलापूर खुर्द, श्रीरामपूर), विद्याताई उदावंत (दिघेवस्ती, धानोरे, ता. राहुरी), सुमन तिजोरे (वडाळा बहिरोबा, ता. नेवासा), सविता बुधवंत (गुंफा, शेवगाव), अण्णासाहेब साळुंके (जिरेवाडी, ता. पाथर्डी), अनिता पवार (लटकेवस्ती, ता. जामखेड), नवनाथ दिवटे, माळवदे वस्ती, ता. कर्जत), भावना मोहिते (इरिगेशन कॉलनी, मढेवडगाव ता. श्रीगोंदा), ज्योती साबळे, पवारवाडी, सुपा, ता. पारनेर), शरद धलपे, काळामळा, नगर).

केंद्रप्रमुख

१) बाळासाहेब दळवी, चास, अहमदनगर

२) भाऊसाहेब गायकवाड, वांबोरी ता. राहुरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTeachers Dayशिक्षक दिन