शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

कोपरगावातील प्रगत शिवाजी रोड संयुक्त मित्र मंडळाच्या २४ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता!

By रोहित टेके | Published: April 06, 2023 12:55 PM

कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून खटला सुरू होता. 

कोपरगाव : पाच वर्षांपूर्वी गणेश विसर्जनादरम्यान शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी कोपरगाव शहरातील प्रगत शिवाजी रोड संयुक्त मित्र मंडळाच्या २४ कार्यकर्त्यावर दाखल असलेल्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधिश बी. एम. पाटील यांनी सर्वच २४ आरोपींची बुधवारी निर्दोष मुक्तता केली आहे.  कोपरगाव शहरातील प्रगत शिवाजी रोड संयुक्त मित्रमंडळाच्या कार्यात्यांवर सन २०१८ साली गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नियमाचे उल्लंघन करून विसर्जनाचे मार्गात अडथळा करून बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचा-यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा केल्याच्या आरोपावरून प्रगत शिवाजी रोड संयुक्त मित्र मंडळाच्या २४ कार्यकर्त्यांविरूद्ध विविध कलमाखाली कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून खटला सुरू होता. 

या खटल्यात फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तपासी अधिकारी भरत नागरे, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. आरोपींतर्फे अॅड जयंत आत्माराम जोशी यांनी पोलिस यंत्रणेने आरोपींविरूद्ध राजकीय वादातुन गुन्हा दाखल केल्याचे, तसेच या प्रकरणातील साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिल्या. तसेच प्रथमदर्शनी शासकीय कामात अडथळा नसल्याचा युक्तिवाद करून आरोपींची मुक्तता करण्यात यावी असा युक्तीवाद केला.

सरकारी अभियोक्ता व आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकुन कोपरगाव न्यायाधिश बी. एम. पाटील यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींतर्फे अॅड  जयंत जोशी यांनी कामकाज पाहिले.  तसेच अॅड व्यंकटेश खिस्ते, अॅड वाय. एच. दाभाडे, अॅड एस. डी. मोरे, अॅड एस. ए. जानी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय