शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
3
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
4
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
5
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
6
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
7
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
8
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
9
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
10
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
11
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
12
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
13
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
14
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
15
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
16
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
17
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
18
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
19
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
20
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर

Ahmednagar: कॅफे बनला अश्लील चाळ्यांचा अड्डा! तरुण, तरुणी, चालकास ताब्यात घेऊन सोडले

By शिवाजी पवार | Published: July 15, 2023 11:43 AM

Ahmednagar: श्रीरामपूर शहरातील रेल्वेमार्गावरील शिरसगाव रस्त्यालगतच्या एका कॅफेवर अश्लील चाळे करताना शहर पोलिसांनी तरुण व तरुणींना ताब्यात घेतले. कॅफे चालकासह सर्वांना पोलिस ठाण्यात नेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

- शिवाजी पवारअहमदनगर - श्रीरामपूर शहरातील रेल्वेमार्गावरील शिरसगाव रस्त्यालगतच्या एका कॅफेवर अश्लील चाळे करताना शहर पोलिसांनी तरुण व तरुणींना ताब्यात घेतले. कॅफे चालकासह सर्वांना पोलिस ठाण्यात नेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान ही कारवाई केली.

परिसरातील नागरिकांनी याबाबत तक्रार केली होती. कॅफेवर तरुण- तरुणी जमतात. तेथे अश्लील चाळे केले जात आहेत, असे स्थानिकांचे म्हणणे होते. यापूर्वी हा कॅफे त्याच परिसरानजीक अन्य ठिकाणी सुरू करण्यात आला होता. कॅफेमध्ये पडदे लावून बसण्याची विशेष व्यवस्था येथे केली गेली होती. त्यावर नागरिकांनी आक्षेप घेतला होता. एका खासगी घरमालकाच्या जागेतच कॅफे सुरू करण्यात आला. त्याचा स्थानिकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे घरमालकांकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. या सर्व प्रकारानंतर कॅफे चालकाने अन्य ठिकाणी स्थलांतर केले. मात्र, तेथेही गैरप्रकार सुरूच होते. अखेर शुक्रवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हा प्रकार थांबेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी