शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

चोरट्यांनी हैद्राबादच्या साईभक्तांना लुटले

By admin | Published: August 12, 2016 11:54 PM

कोपरगाव : अज्ञात चोरट्यांच्या टोळीने शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करीत हैद्राबादच्या साई भक्तांना लुटल्याची घटना नागपूर-मुंबई महामार्गावर संवत्सर शिवारात घडली

कोपरगाव : अज्ञात चोरट्यांच्या टोळीने शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करीत हैद्राबादच्या साई भक्तांना लुटल्याची घटना नागपूर-मुंबई महामार्गावर संवत्सर शिवारात घडली. याप्रकरणी चार अनोळखी इसमांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, हैद्राबाद येथील कुटुंब साईबाबांच्या दर्शनासाठी औरंगाबादमार्गे शिर्डीला येत होते. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास प्रकाश काशागौड कोला (वय ३०, रा. रंगारेड्डी, तेलंगणा) हे पत्नी शालीनी, वडील काशा नरसागौड कोला, भाचा अरूणकुमार राजेंद्र गौड, आई व दोन मुलांसह स्वीफ्ट डिझायर कार (क्रमांक टी. एस. ०८ ई.व्ही. ६७३०) मधून मुंबई-नागपूर महामार्गावरून साईबाबांच्या दर्शनासाठी येत होते. दरम्यान पहाटे चार वाजण्याच्या सुमारास संवत्सर शिवारातील पुलाच्या पुढे आले असता लहान मुलास उलटी झाल्याने त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला थांबविले. त्याच वेळी पाठीमागून चौघे अनोळखी तरूण पायी चालत त्यांच्याजवळ आले. हातातील धारदार चाकूचा धाक दाखवत काठ्यांनी व लाथा-बुक्क्यांनी त्यांनी कोला यांना मारहाण केली. वाहनाची मागची काच फोडून आतमध्ये बसलेल्या व्यक्तींच्या अंगावरील सुमारे १ लाख १९ हजार रूपये किमतीचे मनी मंगळसूत्र, कर्णफूले, अंगठ्या असे एकूण ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, बॅग व ५ हजाराची रोकड चोरून पोबारा केला. घटनेनंतर कोला कुटुंबीयांनी पुणतांबा चौफुलीवर येऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. सकाळी पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील व पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र पोलिसांना सुगावा लागला नाही. घटना घडून नऊ तास उलटल्यावर कोला यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अज्ञात चार आरोपींविरूध्द लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस. देवरे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)