शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

लोकप्रतिनिधींनी काय दिवे लावले?

By admin | Published: July 19, 2016 11:41 PM

पाथर्डी : बाजार समिती ताब्यात घेतली आहेच. आता पाथर्डी नगरपालिकाही ताब्यात घेणार आहोत त्यासाठी तुम्ही फक्त रहा,असे आवाहन करतानाच

पाथर्डी : बाजार समिती ताब्यात घेतली आहेच. आता पाथर्डी नगरपालिकाही ताब्यात घेणार आहोत त्यासाठी तुम्ही फक्त रहा,असे आवाहन करतानाच लोकप्रतिनिधींनी काय दिवे लावले?असे टिकास्त्र माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी राजीव राजळेंचे नाव न घेता त्यांच्यावर सोडले. याचवेळी प्रताप ढाकणेंनी गावाच्या भल्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या,असे सांगत घुले-ढाकणे गटाच्या पालिका निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले.मुस्लीम गल्लीत घुले यांच्या विकास निधीतून बांधलेल्या जमातखान्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे, माजी नगरसेवक बंडू बोरूडे, अमोल बडे, नगरसेवक संजय भागवत ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिठूभाई शेख , हाजी दादाभाई चौधरी,अकबर शेख ,इसाक सय्यद , मुन्ना खलिफा, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरूडे आदी हजर होते. घुले म्हणाले,देशातील व राज्यातील सरकार जातीयवादी आहे. आपल्यात गटबाजी कशी होईल व आपल्याला कसा फायदा होईल?, हे विरोधक पाहात आहेत. आपली पोळी भाजून घ्यायची हा त्यांचा उद्योग आहे. पाथर्डी बाजार समिती नुकतीच आपण ताब्यात घेतली आहे. आता पाथर्डी नगरपालिकाही आपल्या ताब्यात येणार हे निश्चित आहे. त्यासाठी आपण सर्व एक राहणे गरजेचे आहे. एक राहिलो तर आपले प्रश्न सुटतील.प्रताप ढाकणे म्हणाले की, या परिसराचे व आमचे गेल्या चाळीस वर्षापासूनचे संबंध आहेत. या परिसराने आमच्यावर कायम प्रेम केले. सध्या काम करणाऱ्यांपेक्षा दिंडोरा पिटणारे जास्त झाले आहेत. त्याउलट घुले यांनी अनेक विकास कामे केली, पण डांंगोरा पिटला नाही. गावाच्या भल्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या, असेही ते शेवटी म्हणाले.नगरसेवक चांद मनियार यांनी प्रास्तविक केले. हाजी सईद शेख यांनी आभार मानले.(तालुका प्रतिनिधी)