शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

महसूल कर्मचाऱ्यांमागे परीक्षेचे ‘झिंगाट’

By admin | Published: July 25, 2016 11:58 PM

अहमदनगर : नोकरी मिळविण्यासाठी विविध परीक्षांना सामोरे जावे लागते़ मात्र नोकरीत दाखल झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गत विविध परीक्षांना सामोरे जावे लागत आहे़

अहमदनगर : नोकरी मिळविण्यासाठी विविध परीक्षांना सामोरे जावे लागते़ मात्र नोकरीत दाखल झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गत विविध परीक्षांना सामोरे जावे लागत असून, महसूलच्या लिपिकांची विभागीय दुय्यम सेवा परीक्षा सोमवारपासून सुरू झाली आहे़ त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांमागे सध्या परीक्षांचे झिंगाट सुरू असल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आहे़सरकारी नोकरीत दाखल झाल्यानंतर विविध वेतनश्रेणी पदरात पाडून घेण्यासाठी परीक्षा घेण्यात येतात़ महसूलच्या कर्मचाऱ्यांची वर्षातून अशा दोनवेळा परीक्षा होत असतात़ विभागीय दुय्यम सेवा परीक्षा आणि त्यानंतर महसूल अर्हता परीक्षा घेण्यात येते़ पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दुसरी परीक्षा देण्यात येते़ पहिल्या परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील ८९ लिपिक पात्र आहेत़ त्यापैकी ५६ लिपिकांनी अहमदनगर महाविद्यालयात सोमवारी झालेल्या परीक्षेस हजेरी लावली़ उर्वरित ३३ लिपिकांनी परीक्षेलाच दांडी मारली आहे़विभागीय दुय्यम सेवा परीक्षेचे एकूण पाच पेपर आहेत़ पहिला न्यायिकबाब हा २०० गुणांचा पेपर असून, ही परीक्षा येत्या २९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहेत़ त्यामुळे परीक्षा देणाऱ्या लिपिकांचा सर्वाधिक वेळ परीक्षेत जात असल्याने त्यांना कार्यालयीन कामकाजासाठी वेळ मिळत नाही़ एकट्या पुरवठा विभागातील सहा कर्मचारी परीक्षा देत आहेत़ त्यामुळे पुरवठा विभागाचे नियोजन कोलमडले आहे़ विभागीय दुय्यम परीक्षेसाठी कर्मचाऱ्यांच्या नियमित कामाची माहिती विचारली जाते़ परीक्षेत भारतीय दंडसंहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, ग्राम पोलीस अधिनियम, जमीन महसूल, लेखा पद्धती, कार्यालयीन कामाची पद्धत, भूसंपादन, गोषवारा लिहिणे, सरकारचे विविध कायदे, नागरी सेवा नियम, पदग्रहण, अवधी, परसेवा, निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकण्याबाबतचे नियम, सेवानिवृत्ती नियम, कोषागार नियमांबाबतचे प्रश्न असतात़ विविध पाच पेपर दिल्यानंतर कर्मचाऱ्यांची तोंडी परीक्षा घेण्यात येते़ ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार नाशिक येथे होणाऱ्या महसूल अर्हता परीक्षेस पात्र ठरतात़ अर्हता परीक्षा नाशिक येथे घेण्यात येते़ ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच वेतनश्रेणी व पदोन्नती येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले़(प्रतिनिधी)