शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

रिक्त पदे १ लाख ७५ हजार, तरीही भरतीला खो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 1:16 AM

अकोला : राज्य शासनाने कर्मचारी भरतीवर बंदी घालून गेल्या काही वर्षांत रिक्त पदांची संख्या प्रचंड वाढवली आहे. सप्टेंबर २०१६ अखेर विविध विभागात रिक्त पदांची संख्या १७७२५९ आहे, यापुढे त्यामध्ये ३० टक्के कपातीसह पदभरती होणार आहे. तर जिल्हा परिषदेतील रिक्त असलेले ४६३५१ पदांपैकी भरतीयोग्य पदेही शासनाकडूनच भरली जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे सर्वाधिक पदे गृह, आरोग्य, जलसंपदा विभागात रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य शासनाने कर्मचारी भरतीवर बंदी घालून गेल्या काही वर्षांत रिक्त पदांची संख्या प्रचंड वाढवली आहे. सप्टेंबर २०१६ अखेर विविध विभागात रिक्त पदांची संख्या १७७२५९ आहे, यापुढे त्यामध्ये ३० टक्के कपातीसह पदभरती होणार आहे. तर जिल्हा परिषदेतील रिक्त असलेले ४६३५१ पदांपैकी भरतीयोग्य पदेही शासनाकडूनच भरली जाण्याची शक्यता आहे.कल्याणकारी राज्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडे हवी असलेली यंत्रणाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची आकडेवारी आहे. त्यातच बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढत असताना शासनाने नोकरी भरती बंद करून तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला आहे. शासनाच्या विविध विभागातील सरळसेवा आणि पदोन्नतीने भरल्या जाणाºया रिक्त पदांच्या माहितीनुसार सर्वाधिक पदे गृह विभागातील आहेत. २३८९८ पदे या विभागात आहेत. त्यानंतर नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेली सेवा ज्या सार्वजनिक आरोग्य विभागातून दिली जाते, त्यात १८२६१ पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर काम करणाºया जलसंपदा विभागात १४६१६ पदे रिक्त आहेत. नागरिकांच्या जीवनमानावर थेट प्रभाव टाकणाºया या तीनही विभागातील रिक्त पदांची संख्या राज्याच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. ग्रामीण विकासाची कामे करणाºया जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदांची संख्या ४६३५१ एवढी आहे. एकूण रिक्त पदांपैकी २६ टक्के पदे जिल्हा परिषदेची आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची कामे कशी करावी. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करताना प्रशासकीय यंत्रणेवर किती ताण येत आहे, याबाबत कोणतेही ठोस पाऊल शासनाने अद्यापही उचलले नाही. 

विविध विभागातील रिक्त पदेकल्याणकारी राज्याच्या संकल्पनेनुसार काम सुरू असलेल्या राज्यात जनकल्याणाची कामे करणाºया यंत्रणांतील रिक्त पदांकडे शासनाने प्रचंड दुर्लक्ष केले आहे. कृषी व पदूम विभागात ७७४१ पदे रिक्त आहेत. उच्च व तंत्र शिक्षण- ३२३६, महसूल व वन विभागातील महसूल-६३९१, वने-२८४८, पुनर्वसन-७००, वैद्यकीय शिक्षण-६४७८, वित्त विभाग-४९२४, आदिवासी विकास- ६५८४, शालेय शिक्षण- ३२८०, सार्वजनिक बांधकाम- ४३८२, सहकार, पणन-२५५१, वस्त्रोद्योग-८९, सामाजिक न्याय-२४४७, उद्योग, ऊर्जा व कामगार- उद्योग-१७००, कामगार-१११४, अन्न व नागरी पुरवठा-२६४६, पाणी पुरवठा व स्वच्छता-५५२, महिला व बालविकास-१२४२, विधी व न्याय- ९२६, नगर विकास विभाग-७२८, नियोजन विभाग-४९८, कौशल्य व उद्योजकता विकास-४६८८, ग्रामविकास व जलसंधारण-१२०, पर्यटन-२५६, सामान्य प्रशासन- २०००, गृह निर्माण-३१२, अल्पसंख्याक-१४, पर्यावरण-२, मराठी भाषा-६५.

जिल्हा परिषदेच्या पदभरतीवर शासनाचा डोळादरम्यान, राज्यातील ३५ जिल्हा परिषदेमध्ये रिक्त असलेल्या पदांवर शासनाची वक्रदृष्टी झाली आहे. आधी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीकडून ही भरती केली जायची. आता शासनाने ही भरती थेट मंत्रालय स्तरावरून करण्याचा निर्णय घेतलेला आहे.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रjobनोकरी