अकोला : जिल्ह्यात बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,६०० झाली आहे. दरम्यान, आणखी १४ जणांनी कोरोनावर मात केली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १०५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये लक्ष्मी नगर गोरक्षण रोड व केशव नगर येथील प्रत्येकी दोन जणांसह, जठारपेठ मुर्तिजापूर, जीएमसी, रमाई अपार्टमेंट गोरक्षण रोड, छत्रपती कॉलनी गोरक्षण रोड व नूर प्लॉट जुने शहर येथील प्रत्येकी एक अशा दहा जणांचा समावेश आहे.१४ जणांना डिस्चार्जशासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून चार, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क व युनिक हॉस्पिटल येथून प्रत्येकी एक अशा एकूण १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.२२३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,६०० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८०९४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २२३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
अकोला जिल्ह्यात आणखी १० पॉझिटिव्ह; १४ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 17:42 IST