अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात मंजूर पाच हजार ४१० सिंचन विहिरींपैकी १० मार्चपर्यंत जिल्ह्यात चार हजार ५०७ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ५१८ विहिरींची कामे सुरू असून अकोला व अकोट या दोन तालुक्यांत सिंचन विहिरींचे १० प्रस्ताव मंजुरीअभावी प्रलंबित आहेत.
सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे मंजूर केली जातात. योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचन विहिरींच्या कामांसाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात पाच हजार ४१० सिंचन विहिरींची कामे मंजूर असून, त्यापैकी १० मार्चपर्यंत जिल्ह्यात चार हजार ५०७ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली असून, सध्या जिल्ह्यात ५१८ सिंचन विहिरींची कामे सुरू आहेत. सिंचन विहिरींच्या कामांसाठी जिल्ह्यातील अकोला व अकोट या दोन तालुक्यांतील प्रत्येकी पाच प्रमाणे १० सिंचन विहिरींच्या कामांचे प्रस्ताव मान्यतेअभावी जिल्हा परिषद आणि संबंधित पंचायत समितीस्तरावर प्रलंबित आहेत.
तालुकानिहाय प्रस्ताव
तालुका प्रस्ताव
अकोला ०५
अकोट ०५
……......................
एकूण १०
विहिरींसाठी आलेले प्रस्ताव
१०
मंजुरीच्या प्रतीक्षेतील प्रस्ताव
१०
सिंचन विहिरींच्या कामांसाठी जिल्ह्यातील अकोला व अकोट या पंचायत समित्यांकडून प्राप्त १० प्रस्ताव त्रुटींची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित पंचायत समितीकडे पाठविण्यात आले. त्रुटींची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल.
-सौरभ कटियार
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
जिल्ह्यात सुरू असलेली
सिंचन विहिरींची कामे!
तालुका कामे
अकोला २६
अकोट ४
बाळापूर ५२
बार्शीटाकळी १७७
मूर्तिजापूर १३०
पातूर १२९
.................................
एकूण ५१८