कोरोना दक्षता निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, आकोट, श्री संत भास्कर महाराज आदर्श सर्वांगीण बालविकास संस्कार ट्रस्ट, आकोली जहागीर व श्री क्षेत्र श्री विठ्ठल रुखमाई संस्थान, वरूर जऊळका येथील पालख्यांना मर्यादित संख्येत जाण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी ॲड. शिरीष ढवळे, ॲड. ईश्वरकुमार पाटील व भय्यासाहेब निचळ उपस्थित होते. सदर संस्था यांच्या प्रत्येकी किमान १० वारक-यांना कोरोना दक्षता नियमांचे पालन करून स्वतंत्र वाहनाद्वारे जाण्याची परवानगी मिळण्याची मागणी पदाधिका-यांनी केली. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य मानून पालखी सोहळ्यावर मर्यादा घालण्यात आली आहे. तथापि, मागणीबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे उपायुक्त अजय लहाने यांनी यावेळी सांगितले.
१० वारकऱ्यांना पंढरपूर वारीकरिता परवानगी द्यावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:14 AM