मंगरूळपीर (जि. वाशिम): तालुक्यातील पेडगाव येथे एका चार वर्षीय मुलीवर लैंगिक अ त्याचार करणार्यास वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रूपये दंड ठोठावला. पेडगाव येथे मनोहर आनंदा इंगोले (वय ५0) याने ५ मे २0१३ रोजी घराशेजारी राहणार्या चार वर्षीय मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष देऊन स्वत:च्या घरात बोलाविले. त्यानंतर ितच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी ओरडल्यामुळे तिची आई बघण्यासाठी गेली असता तिच्या सर्व प्रकार लक्षात आला. त्यानंतर मुलीच्या काकाला बोलावून पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरूद्ध ३७६, २ (आय) पास्को, सहकलम क ६ (पाच एम) बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. पन्नास वर्षीय वृद्धाकडून एका चार वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घृणास्पद घटना घडल्यामुळे सर्वत्र रोष व्यक्त करण्यात येत होता. प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्याने पोलिसांनी साक्षीपुरावे गोळा केले. या प्रकरणामध्ये एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर जिल्हा न्यायाधीश (१) व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी आरोपी मनोहर आनंदा इंगोले याला भादंवि कलम ३७६ मध्ये दोषी ठरवून १0 वर्षांंची सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला तसेच पास्को अंतर्गतच्या कलमानुसार दोषी ठरवून १0 वर्षांंची सक् तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला. दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगाव्या लागणार आहेत. दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता माधुरी मिसर यांनी काम पाहिले.
बलात्का-यास १0 वर्षांंची सक्तमजुरी
By admin | Published: January 07, 2016 2:27 AM