अकोला : कोरोना या संसर्गजन्य विषाणूचे संकट दिवसेंदिवस वाढत असतानाच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नवीन नियमांचे पालन करण्याचे निर्देश देताच वाहतूक शाखेकडून दुचाकी व चारचाकी वाहनांवरील कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली असून, १०० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.दुचाकीवर केवळ एकालाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली असून, चारचाकी वाहनात चालक अधिक दोघे जण अशा तिघांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. यापेक्षा अधिक जणांनी प्रवास केल्यास त्यांची वाहने जप्त करण्याची मोहीम आता शनिवारपासून तीव्र करण्यात आली आहे. वाहनांसदर्भात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहन जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. अकोलेकरांनी आता नवीन नियमांचे पालन करावे. अन्यथा त्यांची वाहने जप्त करण्यात येतील. नियमांचे उल्लंघन केल्यानंतर वाहन जप्त केल्यास विनाकारण लोकप्रतिनिधींना माहिती देण्यात येते. त्यामुळे पोलिसांनाही कारवाई करण्यास अडचणी येत असल्याने शहरात वाहन चालविताना ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे.- गजानन शेळके, वाहतूक शाखा प्रमुख