शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी दिवसभरात एकूण ५५८ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५३२ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर येथील तीन, बार्शीटाकळी, बाळापूर व माधव नगर येथील प्रत्येकी दोन, तर मोरझरी ता. बाळापूर, तापडिया नगर, बातूर अकोट, मलकापूर, सुधीर कॉलनी, देशमुख फैल, मोठी उमरी, रामदास पेठ, टॉवर चौक, बिर्ला रोड, शास्त्री नगर, रणपिसे नगर, अकोट फैल, तोष्णीवाल लेआऊट, गायगाव, गांधी चौक व किनखेड पूर्णा ता. अकोट येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
१०२ कोरोनामुक्त
शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १५, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, स्कायलार्क हॉटेल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ८० अशा एकूण १०२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६३८ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,३१६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,३६३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३१५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६३८ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.