लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या ‘जनता दरबार’ मध्ये विविध विभागासंबंधी १0८ तक्रारी प्राप्त झाल्या असून, जिल्हय़ातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्या अडचणी आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिले.‘जनता दरबार’ मध्ये जिल्हय़ातील नागरिकांनी केलेल्या तक्रारी, मांडलेल्या अडचणी आणि समस्या पालकमंत्र्यांनी ऐकून घेतल्या. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत, नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पालकमंत्र्यांच्या या जनता दरबारात जिल्हय़ातील नागरिकांकडून विविध विभागासंबंधी १0८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद, पोलीस विभाग, कृषी विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, महसूल विभाग, कृषी विभाग व विद्युत विभागाशी संबंधित तक्रारी, अडचणी आणि समस्या नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. विविध समस्या व अडचणींची निवेदने पालकमंत्र्यांनी यावेळी स्वीकारली. नागरिकांनी केलेल्या तक्रारीसंबंधी संबंधित विभागप्रमुखांना विचारणा करीत नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उ पजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अवैध सावकारी प्रकरणांत तातडीने कारवाई करा!पालकमंत्र्यांचे पोलीस विभागाला निर्देशअवैध सावकारीसंदर्भात ‘जनता दरबार’मध्ये सावकारग्रस्त नागरिकांनी केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, अवैध सावकारीच्या प्रकरणांत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सोमवारी पोलीस विभागाला दिले.अवैध सावकारी प्रकरणांत जिल्ह्यातील सावकारग्रस्त शे तकर्यांसह नागरिकांनी सन २0१२ मध्ये पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित सावकारांविरुद्ध अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याची तक्रार, जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात, सावकारग्रस्तांनी मांडली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत, पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच अवैध सावकारी प्रकरणांत संबंधित सावकारांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पोलीस विभागाच्या संबंधित अधिकार्यांना दिले.