शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

CoronaVirus : एकाच ‘व्हीआरडीएल’ लॅबवर ११ जिल्ह्यांचा ताण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 11:08 AM

 संधीग्ध रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी नागपूर येथील ‘व्हीआरडीएल’ लॅबमध्ये केली जात आहे.

अकोला : अकोल्यासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतील कोरोनाच्या  संधीग्ध रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी नागपूर येथील ‘व्हीआरडीएल’ लॅबमध्ये केली जात आहे. गत काही दिवसांपासून कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने या लॅबवर ११ जिल्ह्यांचा ताण येत आहे. त्यामुळे रुग्णांचे वैद्यकीय अहवाल मिळण्यास विलंब होत आहे.सर्वोपचार रुग्णालयातील ‘आयसोलेशन’ कक्षात कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. येथे दाखल रुग्णांचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी दररोज सकाळी ५ वाजता नागपूरसाठी पाठविण्यात येतात. वैद्यकीय तपासणीचा अहवाल येईपर्यंत येथे दाखल प्रत्येक रुग्णावर उपचार सुरू राहतो. शिवाय, नवीन रुग्णही दररोज दाखल होत आहेत. अहवाल मिळेपर्यंत रुग्णाला सुटी देणे शक्य नसल्याने ‘आयसोलेशन’ कक्षात कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. एकाच लॅबवर मर्यादित मनुष्यबळावर सुरू असलेल्या निरंतर कामामुळे ताण वाढत आहे. कामाच्या वाढत्या ताणामुळे वैद्यकीय अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. अकोल्यातील ‘लॅब‘ सुरू झाल्यास मिळणार दिलासा!राज्यात सध्या एकमेव ‘व्हीआरडीएल’ लॅब असून, त्यावर कामाचा ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत अकोल्यातील लॅब सुरू झाल्यास या ‘लॅब’वरील मोठा ताण कमी होणार आहे. अकोल्यातील लॅब ही विदर्भातील दुसरी ठरणार असून, त्याचा लाभ अकोल्यासह बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांनाही होणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूरAkolaअकोला