- राजरत्न सिरसाट
अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात सोयाबीनच्या ३ लाख ५२ हजार ४८२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा बाजारात करण्यात आला होता. आतापर्यंत त्यातील केवळ ९७ हजार ५६६ क्विंटलच बियाण्यांची शेतकऱ्यांनी खरेदी केली असून, ११ लाख ८३ हजार ६७५ क्विंटल बीटी कापसाचे पॅकेट खरेदी करण्यात आले. पावसाच्या अनिश्चिततेचा हा परिणाम असून, यावर्षी प्रथमच बियाणे खरेदीला उशीर झाल्याचे चित्र आहे.वऱ्हाडात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, मूग, उडीद व ज्वारीची पिके घेतली जातात. कापूस पारंपरिक नगदी पीक असल्याने कापूस पेरणीला शेतकरी प्राधान्य देतात. अलीकडे पावसाची अनिश्चितता बघता शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी सुरू केली; पण कापसाच्या पेरणीवर तेवढा परिणाम झाला नाही. यावर्षी मात्र पावसाने दांडी मारल्याने पुन्हा एकदा कापसाऐवजी सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावपर्षी बाजारात उपलब्ध असलेल्या कापसाच्या ३७ लाख ६७,४७० बियाणे पॅकेटपैकी शेतकऱ्यांनी आतापर्यंत ११ लाख ८३ हजार ६७५ पॅकेट बीटी बियाण्यांची खरेदी केली.२६ हजार ४६७ क्ंिवटल तूर बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यापैकी केवळ ४,९५० क्विंटल तूर बियाणे विक्री झाली. मुगाची तर ४,३३० क्विंटल पैकी केवळ ७३८ क्विंटल च बियाण्यांंची विक्री झाली. उडीद बियाणेही ३० हजार ९६२ क्विंटल पैकी केवळ ८ ४६ क्विंटल विक्री झाली. मूग, उडीद पेरणी शक्यतो जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात केली जाते. तथापि, यावर्षी १५ ते २० दिवस पाऊस लांबल्याने या दोन्ही पिकांच्या बियाणे खरेदीकडे आतातरी शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसते.दरम्यान, २० व २१ जून रोजी अकोला जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे. रविवारी २५ ते ३० टक्के विक्री होती ती गुरुवारपर्यंत ४० टक्केवर पोहोचली आहे. आणखी एखादा जोरदार पाऊस आल्यास बियाणे खरेदीला वेग येईल, असे कृषी निविष्ठा विक्रेत्यांना वाटते; पण बियाणे खरेदीला यावर्षी प्रथमच उशीर झाल्याने विक्रेतेही शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत.
शेतकºयांनी बियाणे खरेदी करावे; पण जोपर्यंत ७५ ते १०० मि.मी. पाऊस होऊन जमिनीत ओलावा निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणीसाठीची घाई करू नये, शेतकºयांना वेळोवेळी यासंदर्भात मार्गदर्शन व आवाहन करण्यात येत आहे.डॉ. विलास भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.