- संतोष येलकर
अकोला : शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १३ हजार ८५९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, पात्र शेतकऱ्यांचे थकीत ७७५ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया १ फेबु्रवारीपासून सुरू होणार आहे.शासन निर्णयानुसार महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यानुषंगाने कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र ठरणाºया शेतकºयांच्या याद्या बँकांमार्फत तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १ एप्रिल २९१५ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १३ हजार ८५९ शेतकरी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक व व्यापारी बँकांकडून कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकºयांचा समावेश आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या थकीत ७७५ कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम माफ होणार आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या याद्या १ फेबु्रवारीपासून शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात येणार असून, याद्या मंजुरीनंतर पात्र शेतकºयांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.१,१६९ शेतकºयांचे बँक खाते नाही आधार ‘लिंक’!कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करणे आवश्यक आहे; परंतु कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख १३ हजार ८५९ शेतकºयांपैकी १ हजार १६९ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक अद्याप आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित शेतकºयांनी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकबाकीदार असलेले १ लाख १३ हजार ६५९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, थकबाकीदार शेतकºयांच्या थकीत ७७५ कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम माफ होणार आहे. पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया १ फेबु्रवारीपासून सुरू होणार आहे.- अलोक तारेणियाव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक