शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
5
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
6
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
7
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
8
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
9
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
10
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
11
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
12
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
13
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
14
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
15
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
16
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
17
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
18
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
19
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

राज्यात १५ आॅक्टोबरपासून सुरू करणार ११५ कापूस खरेदी केंद्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 1:40 PM

भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळाने १५ आॅक्टोबर रोजी राज्यात ६५ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या निर्णय घेतला आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला : राज्यात कापूस काढणी हंगाम सुरू होत असल्याच्या पृष्ठभूमीवर येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असून, राज्यातील कापसाचे क्षेत्र बघता दोनशे खरेदी केंद्रांची गरज असताना महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस पणन महासंघाने तज्ज्ञ मनुष्यबळाचा अभाव असल्याचे कारण देत यावर्षी केवळ ५० खरेदी केंद्र सुरू करणार आहे. तर भारतीय कापूस महामंडळ ६५ खरेदी केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला आहे. या अपुऱ्या खरेदी केंद्रांमुळे कापूस उत्पादक शेतकºयांची धावपळ होणार आहे.राज्यात यावर्षी ३९ लाख हेक्टरपर्यंत कापूस पेरणी झाली असून, उत्पादन भरघोस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पृष्ठभूमीवर भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळाने १५ आॅक्टोबर रोजी राज्यात ६५ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या निर्णय घेतला आहे. महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस पणन महासंघ ‘सीसीआय’चा उपअभिकर्ता म्हणून ५० खरेदी केंद्र सुरू करणार आहेत. या दोन्ही संस्थांमिळून राज्यात ११५ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. पणन महासंघाचे राज्यात ११ विभाग आहेत (झोन). त्यानुसार कापूस पट्ट्यात प्रत्येक दहा किलोमीटरच्या आत एक शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करणे अनिवार्य आहे. यापूर्वी ते होते म्हणजचे राज्यात २०० खरेदी केंद्रांची गरज आहे; परंतु पणन महासंघाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसून, गे्रडरची संख्याही अल्प आहे. हा विचार करू न पणन महासंघाने यावर्षी ५० खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ आॅक्टोबरदरम्यान, ‘सीसीआय’ खरेदी सुरू करणार असून, १७ आॅक्टोबरपर्यंत पणन महासंघ खरेदी सुरू करेल.

 कापसाचे दर झाले कमी!यावर्षी सुरुवातीला या कापसाला प्रतिक्ंिवटल ६,१०० पर्यंत दर मिळाले; परंतु आता मात्र कापसात आर्द्रता, ओलावा असल्याचे सांगण्यात येत असल्याने हे दर प्रतिक्ंिवटल एक हजार रुपयाने कमी झाले आहेत.

येत्या १५ आॅक्टोबरनंतर राज्यात ५० कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. खरे तर राज्यात आजमितीस २०० खरेदी केंद्रांची गरज आहे. तथापि, मनुष्यबळाचा अभाव असल्याने हा निर्णय घेण्यात आला. कृषी विभागाने त्यांच्याकडील मनुष्यबळ सहा महिन्यांसाठी उपलब्ध करू न दिल्यास खरेदी केंद्र वाढविता येतील.प्रसेनजित पाटील,उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघ.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी