अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यात ३ मेपर्यंत १ लाख १५ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, ४८६ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे.उर्वरित थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासन निर्णयानुसार २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकºयांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यानुषंगाने गत सप्टेंबर अखेरपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केले होते. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आली. आॅनलाइन अर्ज भरलेल्या १ लाख ३८ हजार शेतकºयांपैकी ३ मे १ लाख १५ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, ४८६ कोटी रुपयांची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. उर्वरित २३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे.कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्जाची मुदत २० मेपर्यंत!कर्जमाफी योजनेंतर्गत यापूर्वी आॅनलाइन अर्ज करू न शकलेल्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी शासन निर्णयानुसार कर्जमाफीसाठी सेतू केंद्रांवर आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत २० मेपर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज न केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यां ना २० मेपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.कर्जमाफी योजनेंतर्गत ३ मेपर्यंत जिल्ह्यात १ लाख १५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, ४८६ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे.-जी.जी. मावळे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था).