तालुक्यातील मंचनपूर, कोहा व लाडेगाव ह्या तीन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे ३५ ग्रामपंचायतींमधील २७८ जागांवर ७०५ उमेदवारांची निवडून येण्यासाठी चांगलीच कसरत सुरू आहे. निवडणुकीकरिता गावातील मतदान केंद्रावर साहित्य घेऊन कर्मचारी सज्ज झाले आहेत. निवडणुकीदरम्यान मास्टर ट्रेनर म्हणून ५ तलाठी नियुक्ती केले आहेत. क्षेत्रीय अधिकारी म्हणून मंडळनिहाय ३ मंडळ अधिकारी नेमणूक केली आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ४७६ कर्मचारी नियुक्त केले आहेत.
दरम्यान १९ गावांत एकूण ५६ सदस्य बिनविरोध निवडले आहेत. सध्या कावसा बु,पातोंडा, दिनोडा, देवर्डा, हनवाडी, चंडिकापूर, पणज, खिरकुंड बु.-, वरूर, मक्रमपूर, एदलापूर,पिंप्री खु.,खैरखेड, अडगाव खु.,आलेवाडी,नांदखेड, उमरा,जऊळका,आसेगाव बाजार,बोर्डी, मोहाळा, आंबोडा, सावरा, कुटासा,जऊळखेड बु., दनोरी,चोहोट्टाबाजार, किनखेड, करोडी, देवरी,पळसोद,पारळा,कवठा बु.,रूईखेड, वडाळी देशमुख. या ग्रामपंचायतींमध्ये २७८ जागांसाठी ७०५ उमेदवारांत सामना रंगणार आहे. काही गावांत अटीतटीची लढत होत आहे. तर अनेक गावांत नातेवाईक एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत.