शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

कृषी विद्यापीठातील पिके धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:27 AM

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी मागील १२ दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारल्याने कृषी विद्यापीठाचे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘समान काम, समान वेतन’ लागू करू न, थकबाकी देण्यात यावी, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी मागील १२ दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारल्याने कृषी विद्यापीठाचे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे. मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरील मुगाचे पीक वाळले आहे; परंतु काढण्यासाठी मजूरच नसल्याने पावसाने हे पीक सडण्याच्या मार्गावर आहे. या संपावर तोडगा न निघाल्याने कृषी विद्यापीठाची इतरही संशोधनाची कामे प्रभावित झाली आहेत.केंद्र सरकारने पारित केलेल्या कायदा १९७६ कलम ४ अन्वये तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे सर्व कृषी विद्यापीठात हे वेतन दिले जात आहे. तथापि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी मजुरांना समान वेतन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत मजुरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. विद्यापीठाच्या बाराही विभागातील रोजंदारी मजुरांनी कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर हे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार संघटनेच्या नेत्यांनी केल्याने शास्त्रज्ञांना रात्री कृषी विद्यापीठाच्या इमारती तसेच संशोधन व पिकांंची काळजी घ्यावी लागत असून, प्रशिक्षणार्थी, विद्यार्थ्यांनाही शेतीची कामे करण्याची वेळ आली आहे.मजुरांच्या विद्यापीठ स्तरावरील मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. ‘समान काम, समान वेतन’ हे कृषी विद्यपीठाच्या अख्त्यारित येत नाही. त्यासाठी कार्यकारी परिषदेत ठराव घेऊन शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, नेत्यांनासोबत घेतले जाईल. त्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकºयांनी कामावर येण्याची गरज आहे.- डॉ. दिलीप एम. मानकर,संचालक संशोधन, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला.