अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यातील चार मतदारसंघात १२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पाचही विधानसभा म तदारसंघात ९४ इच्छुक उमेदवारांना १७१ उमेदवारी अर्जांंचे वाटप करण्यात आले.विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २0 सप्टेंबरपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी गुरुवारी अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघां पैकी चार मतदारसंघात १२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये अकोला पूर्व ३, आकोट ४, बाळापूर ३ आणि मूर्तिजापूर मतदारसंघातून २ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करणारांमध्ये आकोट मदारसंघात भारिप-बमसंचे प्रदीप वानखडे, अपक्ष विनोद डाबेराव, सैय्यद शरीफ सैय्यद सिकंदर, प्रवीण काळे, अकोला पूर्व मतदारसंघात भारिप- बमसंचे विद्यमान आमदार हरिदास भदे, अपक्ष अरुण दंदी, विश्वास सरकटे, बाळापूर मतदारसंघात भारिप-बमसंचे विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार, शिवसंग्रामचे संदीप लोड-पाटील, अपक्ष श्रावण सोनोने आणि मूर्तिजापूर मतदारसंघात भारिप-बमसंचे संदीप सरनाईक व अपक्ष हिरालाल ऊर्फ पंडित सरदार इत्यादी उमेदवारांचा समावेश आहे.
अकोल्या जिल्ह्यातील चार मतदारसंघात १२ उमेदवारी अर्ज
By admin | Published: September 26, 2014 1:55 AM