अकोला : ‘नाफेड’मार्फत हरभरा खरेदीची मुदत मंगळवार, २९ मे रोजी संपत असताना, जिल्ह्यात आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी २८ मे पर्यंत केवळ १ हजार ५०७ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात आला आहे. त्यामुळे खरेदी बंद झाल्यानंतर जिल्ह्यातील ११ हजार ९६२ शेतकऱ्यांना हरभरा खरेदीसाठी ‘वेटींग’वरच राहावे लागणार आहे.आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, अकोट, पातूर, पारस, वाडेगाव व पिंजर या सात खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदी करण्यात येत आहे. ४ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दराने हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यातील १३ हजार ४६९ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली; मात्र खरेदी केलेला हरभरा साठविण्यासाठी जिल्ह्यातील गोदामांमध्ये जागा उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यात खरेदीच्या सुरुवातीपासूनच हरभरा खरेदी संथगतीने करण्यात आली. त्यामुळे आॅनलाइन नोंदणी केलेल्या १३ हजार ४८९ शेतकºयांपैकी २८ मे पर्यंत केवळ १ हजार ५०७ शेतकºयांचा ५५ हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असून, जिल्ह्यातील ११ हजार ९६२ शेतकºयांचा हरभरा खरेदी करणे अद्याप बाकी आहे. ‘नाफेड’मार्फत हरभरा खरेदीची मुदत मंगळवार, २९ मे रोजी संपुष्टात येत आहे. त्यानुसार २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजतापसून, जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवरील हरभरा खरेदी बंद होणार आहे. खरेदी बंद झाल्यानंतर नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील ११ हजार ९६२ शेतकºयांना हरभरा खरेदीसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकºयांचा हरभरा खरेदी करण्यात येणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.हरभरा खरेदीचे असे आहे वास्तव !-आॅनलाइन नोदणी केलेले शेतकरी : १३४५९- हरभरा खरेदी केलेले शेतकरी : १५०७-खरेदी करण्यात आलेला हरभरा : ५५००० क्विंटल-हरभरा खरेदीच्या प्रतीक्षेत शेतकरी : ११९६२
कमी भावात हरभरा विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ !नाफेडमार्फत हरभरा खरेदीची मुदत मंगळवारी संपुष्टात येत आहे. आधारभूत किंमत दराने खरेदी बंद झाल्यानंतर हरभरा विकणार कोठे, असा प्रश्न निर्माण झालेल्या शेतकºयांवर बाजारात कमी भावात हरभरा विकण्याची वेळ येणार आहे.
नाफेडमार्फत हरभरा खरेदीत जिल्ह्यात १३ हजार ४५९ शेतकºयांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार ५०७ शेतकºयांचा ५५ हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. उर्वरित ११ हजार ९६२ शेतकºयांचा हरभरा खरेदी करणे बाकी असून, खरेदीची मुदत २९ मे रोजी सायंकाळी संपत आहे.- राजेश तराळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.