अकोला : स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सुभाष चौक व वाशिम स्टँड येथील दोन दुकानांवर छापे घालून दुकानांमध्ये विक्रीस असलेले १२0 किलो अत्यंत ज्वलनशील असलेले कॅल्शियम कार्बाईड जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली. शहरातील नागरी वस्तीमध्ये असलेल्या दुकानांमधून ज्वलनशील कॅल्शियम कार्बाईड पदार्थ विकल्या जात असल्याची माहिती एलसीबीचे पीएसआय ज्ञानेश्वर फड यांना मिळाली. त्यांनी शहरातील सुभाष चौकातील अब्बासअली शेख युसूफअली कपासी (५२) आणि वाशिम स्टँडवरील शरद मधुकरराव लगड (४0) यांच्या दुकानांवर छापा घातला. दुकानाची पाहणी केली असता, या दोघांनीही एका लोखंडी ड्रममध्ये कॅल्शियम कार्बाईड पदार्थ लपवून ठेवला होता. पोलिसांनी दोन्ही दुकानातील ड्रम जप्त केले. दोघाही विक्रेत्यांना अटक केली. ही कारवाई पोलिस हवालदार नरेंद्र चर्हाटे, जितेंद्र हरणे, मनोहर मोहोड, हसन शेख, संतोष चिंचोळकर, संतोष गवई यांनी केली. ** कशासाठी वापरले जाते कॅल्शियम कार्बाईडकॅल्शियम कार्बाईड हा पदार्थ अत्यंत ज्वलनशील आहे. या पदार्थाचा वापर गॅस वेल्डिंगसाठी, विविध प्रकारची कच्ची फळे पिकविण्यासाठी केला जातो. एवढेच नाहीतर कॅल्शियम कार्बाईड पदार्थामध्ये विविध प्रकारचे रासायनिक पदार्थ मिसळून त्याचा स्फोटक पदार्थ करण्यासाठीही वापर केला जातो. हा पदार्थ इमारतीमध्ये, विहिरींमध्ये स्फोट करण्यासाठीही वापरला जातो. पाण्यामुळे अधिक ज्वलनशील बनतो. कॅल्शियम कार्बाईड पदार्थ हा विशेषकरून गॅस वेल्डिंगसाठी वापरात येतो. हवेच्या संपर्कात हा पदा र्थ आल्यास तो विरघळतो. कॅल्शियम कार्बाईडमध्ये आग लागल्यास आणि ती आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा वापर केल्यास, त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. पाण्याचा मारा केल्यानं तर आग आटोक्यात येण्याऐवजी अधिक भडकते, अशी माहिती पीएसआय ज्ञानेश्वर फड यांनी दिली.
१२0 किलो ज्वलनशील कॅल्शियम कार्बाईड जप्त
By admin | Published: September 13, 2014 1:19 AM