मूर्तिजापूर (जि. अकोला), दि. ३- मूर्तिजापूर येथील ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी त्यांच्या सहकार्यांसोबत ३ मार्च रोजी चिखली गावाजवळ धाड टाकून १२ हजार रुपयांची दारू व मोटारसायकल जप्त केली. मूर्तिजापूर येथून दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याच्या गुप्त माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मूद्गतजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वात पो.हे.काँ. गोपाल भवाने, पो.हे.काँ. तेजराव तायडे, पोलीस शिपाई रवी डाबेराव यांनी चिखली गावाजवळ धाड टाकली. यावेळी एमएच ३0 एएस ८९४३ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून दारूची अवैध वाहतूक करणारे सनी बबलू जाधव व सोनू चौहान रा. मूर्तिजापूर यांना रंगेहात पकडले. यांच्या ताब्यातून १२ हजार रुपये किमतीचे देशी दारूचे पाच बॉक्स व ४0 हजार रुपये किमतीची एक मोटारसायकल एकूण ५२ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या ६५ (ई) कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
मूर्तिजापुरात १२ हजारांची अवैध दारू जप्त
By admin | Published: March 04, 2017 2:34 AM