शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

काटेपुर्णा अभयारण्यात आढळल्या पक्ष्यांच्या १२५ प्रकारच्या दुर्मिळ प्रजाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 5:14 PM

अकोला: जिल्हयातील काटेपूर्णा जलाशयाभोवत वसलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात वनविभागाद्वारे दुर्मिळ पक्ष्यांची गणना उपक्रम राबविण्यात आला असून, या दरम्यान दुर्मिळ पक्ष्यांच्या तब्बल १२५ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे २५ फेब्रूवारी रोजी एक दिवसीय पक्षी निरीक्षण व गणना करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. काटेपुर्णा जलाशयात आॅस्प्रे, ब्लॅकस्टॉर्क, व युरेशीयन थीकंनी या महत्वपुर्ण नोंदी ठरल्या.जंगल प्रजाती पक्षांमध्ये लेसर यलोनॅप वुडपेकर या दुर्मीळ सुतार पक्षांची नोंद घेण्यात आली.

अकोला: जिल्हयातील काटेपूर्णा जलाशयाभोवत वसलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात वनविभागाद्वारे दुर्मिळ पक्ष्यांची गणना उपक्रम राबविण्यात आला असून, या दरम्यान दुर्मिळ पक्ष्यांच्या तब्बल १२५ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.काटेपुर्णा अभयारण्यातील दुर्मिळ पक्षी व त्यांच्या प्रजाती यांची गणना करण्याकरीता २५ फेब्रूवारी रोजी एक दिवसीय पक्षी निरीक्षण व गणना करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सकाळ व संध्याकाळ या दोन सत्रात अभयारण्याच्या चार भागांमधील पक्षी मोजण्यात आले. या अंतर्गत १२५ प्रकारच्या पक्षी प्रजाती नोंदवण्यात आल्या. ज्यामध्ये अभयारण्याचा भाग असलेल्या काटेपुर्णा जलाशयात आॅस्प्रे, ब्लॅकस्टॉर्क, व युरेशीयन थीकंनी या महत्वपुर्ण नोंदी ठरल्या. तर जंगल प्रजाती पक्षांमध्ये लेसर यलोनॅप वुडपेकर या दुर्मीळ सुतार पक्षांची नोंद घेण्यात आली. तसेच सल्फर वेलीड बार्बलर, ट्री पीपीट, ब्लॅक नॅप मोनार्च, आॅरेंज हेडेड थ्रश, अल्ट्रा मरीन फ्लायकॅचर, एशीयन पॅरॉडाईज फ्लायकॅचर, विशेष नोंदी घेण्यात पक्षीमित्रांना यश आले.अभयारण्यात रात्रीच्या मुक्कामाला येणारे हजारो पोपट व त्यात अधिक प्रमाणात असलेले अलॅक्झेंड्रीन पॅरॅकीट (आययूसीएन च्या यादीत दुर्मिळ स्थितीत आहेत) असणे ही बाब वैशिष्टयपुर्ण आहे. तसेच पश्चिम घाटातील मुळचा असणारा पिवळ्या मानेचा सुतार व इतर काही दुर्मिळ पक्षांच्या नोंदी काटेपुर्णा अभयारण्यात होणे ही बाब उत्साहवर्धक ठरली. अनेक दुर्मिळ पक्षांचा वावर या अभयारण्यात असल्याने या अभयारण्याकडे ‘पक्षी अभयारण्य’ या दृष्टीकोनातून बघणे व पुढची काळजी घेणे गरजेचे आहे. काटेपुर्णा अभयारण्य हे पर्यटनाचे दृष्टीने निसर्गरम्य स्थान असून, लगतच्या वनराईमुळे पक्षांना आश्रय घेण्यास काटेपुर्णा अभयारण्य हे एक आदर्श आश्रयस्थान आहे.पक्षी अभ्यासकांचा सहभागवन्यजीव विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात अकोल्याचे पक्षी अभ्यासक व छायाचित्रकार रवी धोंगळे, देवेंद्र तेलकर, विष्णू लोखंडे, डॉ. संदीप साखरे तसेच वाशिमचे मिलींद सावेदकर, पुरूषोत्तम इंगळे, निलेश सरनाईक अंगुल खांडेकर यांनी सहभाग नोंदविला. तसेच माहिती व जनसंपर्क कार्यालयाचे कॅमेरामन चंद्र्रकांत पाटील यांनी या महत्वपुर्ण आयोजनाचे छायांकन करून पक्षी मित्राचा उत्साह वाढवला.

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Forestकाटेपूर्णा अभयारण्यwildlifeवन्यजीवbirds sanctuaryपक्षी अभयारण्य