शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

मनपातील बारा व तेराव्या वित्त आयोग निधीच्या खर्चाची होणार चौकशी!

By admin | Published: April 14, 2016 2:06 AM

स्थायी समिती सभापतींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती.

अकोला: अल्पसंख्याक निधी अंतर्गत विहित वेळेत प्रस्ताव सादर न केल्याने निधी परत गेला. तेराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून नियमबाह्य देयके देणे, विनापरवानगी निविदा काढणे, बारा व तेराव्या वित्त आयोगाचा निधी नियमबाह्य पद्धतीने खर्च करण्याच्या मुद्दय़ावरून मनपा स्थायी समितीने नाराजी व्यक्त केली आणि या नियमबाह्य खर्चाची चौकशी करण्यासाठी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची चौकशी समिती स्थापन केली. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात ७ एप्रिल रोजी झालेल्या सभेमध्ये बाराव्या, तेराव्या वित्त आयोगाचे अनुदान, रस्ता अनुदान, नगरोत्थान अनुदान अंतर्गत करण्यात आलेल्या नियमबाह्य खर्चाबाबत सभापती विजय अग्रवाल यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले होते. मनपा सभेत निधी खर्चाबाबतचे नियोजन झाले आणि विषय अजेंड्यावर असताना नियमबाह्य खर्च कसा करण्यात आला, स्थायी समितीला विश्‍वासात का घेण्यात आले नाही, अशी विचारणा स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी केली होती. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले होते. त्यामुळे सभापती विजय अग्रवाल यांनी नियमबाह्य खर्चाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.