अकोला: येथील वसंत देसाई स्टेडियममध्ये ६७ वी राष्ट्रीय शालेय बॉक्सींग स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १७ ते २२ डिसेंबर दरम्यान करण्यात आले असून, त्यामध्ये अकोला क्रीडा प्रबोधनीच्या १३ बॉक्सरांचा समावेश आहे. शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवित खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे.
अकोला येथे आयोजित ६७वी राष्ट्रीय शालेय बॉक्सींग स्पर्धेत हे खेळाडू उत्कृष्ट प्रदर्शन दाखवून महाराष्ट्र राज्याला सुवर्ण पदक मिळवून देतील असा आशावाद क्रीडा प्रेमींनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत ३७ वजनगटामध्ये मुले सहभागी होत आहेत. त्यापैकी विविध गटांमध्ये अकोल्याचे १३ बॉक्सरांचा समावेश असून, हि बाब जिल्ह्यासाठी भुषणीय आहे. महाराष्ट्र संघामध्ये राष्ट्रीय पातळीचे खेळाडू असून क्रीडा प्रबोधिनी अकोला येथील एकुण ११ खेळाडुंचा समावेश आहे.
त्यामध्ये वैभव दामोदर, गोपाल गणेशे, रविंद्र पाडवी, आदित्य तायडे, वैभव जारवाल, कनक खंडारे, अथर्व भट्ट, तन्मय कळंत्रे, शोएब गाडेकर आणि रेहान शाह यांचा सहभाग आहे. संघ हा सर्वोत्तम कामगिरी करण्यास सज्ज असून, प्रशिक्षक म्हणुन योगेश निषाद, आदित्य मने व गजानन कबीर हे महाराष्ट्र संघाची जबाबदारी सांभाळत आहेत. प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र संघ उच्चतम कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावेल अशी अपेक्षा बाळगण्यात येत आहे. शिबिर जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट यांच्या निदर्शनाखाली होत आहे. खेळाडू करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्वराष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा अकोल्यात संपन्न होत असून, त्यासाठी देशभरातून खेळाडू शहरात येणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली असून, त्यामध्ये अकोल्याच्या १३ बाॅक्सरांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्राच्या संघात ११ खेळाडूंचा सहभाग असून, हे खेळाडू महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.