अकोला, दि. १५- इयत्ता बारावीच्या परीक्षेदरम्यान भरारी पथकांनी घातलेल्या धाडीमध्ये तीन परीक्षा केंद्रांवरील १३ विद्यार्थ्यांंंनी कॉपी केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. जिल्हय़ातील ६७ परीक्षा केंद्रांवर बारावी परीक्षा सुरू आहे. बुधवारी बारावीचा अर्थशास्त्र विषयाचा पेपर होता. कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी नियुक्त केलेल्या भरारी पथकांनी बुधवारी दुपारी बाळापूर येथील धनाबाई उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावर अचानक धाड घातली.या धाडीत तीन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. ही कारवाई माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्या पथकाने केले. अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथील संत गजानन महाराज विद्यालय परीक्षा केंद्र आणि कुटासा येथील शिवाजी विद्यालय परीक्षा केंद्रावर प्राथमिक माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांनी धाड घातली. त्यांनी या दोन्ही परीक्षा केंद्रांवर कॉपी करणार्या दहा विद्यार्थ्यांंंना निलंबित केले.
१३ कॉपीबहाद्दर निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2017 2:41 AM