जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्तीची कामे तसेच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकरिता १३ कोटींचे अंदाजपत्रक या सभेत मंजूर करण्यात आले. अंदापत्रकातील प्रस्तावित निधीची जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी सर्वसाधारण सभेकडे शिफारस करण्याचेही या सभेत ठरविण्यात आले. जिल्हा परिषद लघुसिंचन विभागांतर्गत कामांची माहितीदेखिल या सभेत घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतीभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपाध्यक्ष सावित्री राठोड, सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, कृषी सभापती पंजाबराव वडाळ, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, महिला व बालकल्याण सभापती मनिषा बोर्डे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुभाष पवार यांच्यासह समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जि.प. आरोग्य समितीची सभा;
अंदाजपत्रकावर चर्चा !
जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा गुरुवारी पार पडली. या सभेत २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी आरोग्य विभागाचे प्रस्तावीत अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक वाचून दाखविण्यात आले. त्यानुषंगाने आरोग्य विभागाच्या अंदाजपत्रकावर सभेत चर्चा करण्यात आली. टेलीमेडीसीन या उपक्रमांतर्गत साहित्य खरेदीसाठी शासनाकडे निधीची मागणी करण्याच्या सूचना सभेत देण्यात आल्या. उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समिती सदस्य पुष्पा इंगळे, अर्चना राऊत, डाॅ.बोबडे, विजया दांदळे, प्रमोदिनी कोल्हे, अकोला पंचायत समिती सभापती वसंतराव नागे,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.सुरेश आसोले व संबंधित अधिकारी उपस्थित होते.