शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,४३७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १६३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,२७७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये दहीहांडा येथील ७० वर्षीय पुरुष, पातूर येथील ५३ वर्षीय महिला, मूर्तिजापूर येथील ३५ वर्षीय पुरुष, भौरद येथील ५१ वर्षीय पुरुष, कारली, ता. मूर्तिजापूर येथील ५७ वर्षीय पुरुष, खानापूर, ता. पातूर येथील ८० वर्षीय पुरुष, शास्त्रीनगर येथील ७१ वर्षीय महिला, मोठी उमरी येथील ८६ वर्षीय महिला,
मलकापूर येथील ६९ वर्षीय पुरुष, अकोट येथील ६० वर्षीय पुरुष, तेल्हारा येथील ५० वर्षीय पुरुष, बाभूळगाव, ता. पातूर येथील पुरुष व सिंदखेड येथील ३५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
तालुहानिहाय रुग्णसंख्या
मूर्तिजापूर-१९, अकोट-२०, बाळापूर-२३, तेल्हारा- सहा, पातूर- पाच, अकोला- ९० (अकोला ग्रामीण- २८, अकोला मनपा क्षेत्र- ६२)
५२८ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३५, उपजिल्हा रुग्णालय येथील एक, पीकेव्ही जॅम्बो हॉस्पिटल येथील दोन, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील पाच, खासगी रुग्णालयांमधील ५८, तर होम आयसोलेशनमधील ४२५ अशा एकूण ५२८ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.
५,८७५ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५४,२५७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४७,३५४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,०२८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,८७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.